कारंजा : श्री बाबुजी देवाजी मठ संस्थानच्या साळीपूरा येथिल, श्री आशीर्वाद गणेश मंदिर येथे, दरवर्षीप्रमाणे यंदाही, श्रीगणेशोत्सवा निमित्त, दहा दिवस पर्यंत, विविध कार्यक्रमाची मांदियाळी होती. कार्यक्रमात भजन, , ग्रंथवाचन आदि, कार्यक्रम पार पडले, गुरुवारी दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा महायज्ञ व महाआरती करण्यात आली, महाआरतीचा सन्मान समाजसेवक रितेशराव देशमुख परिवार यांना मिळाला. त्यानंतर दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला असता कारंजा पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी महाप्रसाद घेतला. आशीर्वाद गणेश मंदिराचे विश्वस्त मंडळ, प्रकाशराव भोपाळे अध्यक्ष, डॉ आनंद गणेशे, उपाध्यक्ष महादेवराव मेहरे, सचिव दिनेशराव पाटणकर, कोषाध्यक्ष , सदस्य अनिल बुरांडे, रामदासजी ठणगण, रमेश गाढवे आनंद गणेशे ,सदस्य व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते परिश्रम घेतले.