अहेरी तालुक्यातील येरमणार येथे मुक्तिपथ तालुका चमूद्वारा घ बैठक घेण्यात आली. त्याअनुषंगाने आयोजित गाव सभेमध्ये अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सोबतच गावामध्ये दारूविक्री केल्यास ५० हजार रुपये दंड, दारू पिऊन भांडण केल्यास १० हजार, जुगार खेळणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड ठोठावून तो वसूल
करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. येरमणार येथील गाव सभेमध्ये महिलांचा अधिक सहभाग होता. यावेळी गावातील दारू विक्रीवर चर्चा घडवून आणली व गावात आजपासून कोणी दारू विक्री करणार नाही हा निर्णय सर्वानुमते गावकऱ्यांनीच घेतला. दंड दिला नाही तर त्यांच्यावर पोलिस कारवाई तसेच ग्रामपंचायतीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. गावामध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड ठोठावून तो वसूल करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये झाला.