दिगंबर जैन सैतवाळ समाजाची सर्वात मोठे व्यासपीठ असलेली "अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था,शाखा कारंजा लाड " च्या वतीने कारंजा लाड शहरात सकल दिगंबर जैन समाजासाठी उप वर-वधू परिचय संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २५ जानेवरी २०२६ रविवार रोजी प्रशस्त व वातानुकूलित अशा भव्य बाबासाहेब धाबेकर सांस्कृतिक सभागृह ,कारंजा लाड येथे भव्य-दिव्य स्वरूपात आयोजिलेल्या एकमेवाद्वितीय अशा या मेळाव्याचे आयोजन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे, महामंत्री नितीन नखाते ,कोषाध्यक्ष विजय लुंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून , मेळावा कार्यकारिणी मध्ये संमेलनाचे अध्यक्ष प्रा.प्रविण फुरसुले,कार्याध्यक्ष राजकुमार फुरसुले ,उपाध्यक्ष संजय डाखोरे ,धनंजय डोळस, सचिव पवन उखळकर, सहसचिव सुहास फुरसुले,कोषाध्यक्ष पपिश कहाते,सहकोषाध्यक्ष ललित रोडे ,कार्यवाहक सचिन फुरसुले, सहकार्यवाहक संदीप हनवंते,संघटक अजय इंदाणे,सहसंघटक दीपक चुंबळे,मार्गदर्शक प्रकाश सरोदे ,सुमेरचंद्र आगरकर,प्रमोद कहाते,माणिकराव इंदाने,प्रकाश फुरसुले, नितीन काळे इत्यादी समाज बांधवांचा समावेश आहे.
अ.दि.जैन सैतवाळ संस्था च्या वतीने समाजहितपयोगी विविध उपक्रम राबविले जातात . यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय साहित्य वाटप , गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आर्थिक सहाय्यता,समाज बांधवांचे वाढदिवस साजरा करणे तसेच "आर्यनंदी" दिनदर्शिका चे घरोघरी निशुल्क वाटप इत्यादी उपक्रमांतुन समाजबांधवांच्या मनामनात रुळलेल्या संस्थेच्या वतीने "वधू-वर परिचय संमेलन-२०२६" च्या निमित्ताने संस्थेच्या उपक्रमांच्या श्रुंखलेत भर पडली असून, सदर संमेलनामध्ये उमेदवारांनी अधिकाधिक संख्येने नोंदणी करावी यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सदर नोंदणी व्यवस्था ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने
करण्याची सोय उपलब्ध असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९४२३६४८३३६ किंवा ८२०८०३२०२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....