Gadchiroli, March 30: On the night of March 29, Cinestyle set a trap based on the secret information received by the local crime branch and seized the vehicle along with valuables worth Rs. 17 lakh 81 thousand 600. Amit Barai who was with the driver in this case. Gauripur Chamorshi was taken into custody.
According to information received, Local Crime Branch, Gadchiroli received confidential information that Shankar Anna, a liquor smuggler from Chamorshi area, was going to bring a large consignment of liquor from Chandrapur district through his associates. After that, officers and employees of the local crime branch laid a trap and blockaded the Haranghat route during the night.
Meanwhile, the pick-up van carrying liquor broke the barricades and ran away, but the police started chasing the vehicle without a moments delay. At this time, the driver of the vehicle, who was transporting illegal liquor, took his vehicle in his possession through the forest road and to different villages of Poste Chamorshi and Poste Ashti to avoid action. But the police continuously chased for 100 to 125 kmAfter doing so, the driver and his companion left the vehicle post near Sonapur village in Chamorshi area and tried to escape. But the police chased them and Amit Barai who was with the driver. Gauripur Chamorshi was detained but the driver Rakesh Mashid Res. Gauripur Chamorshi took advantage of the darkness and absconded from the spot.
As 139 boxes of domestic liquor and 5 boxes of foreign liquor were found in the said vehicle, the police confiscated the said liquor and the pick-up vehicle used for transportation worth 17 lakh 81 thousand 600 rupees. In this regard, a case has been registered against the accused Shankar Anna Roy, Rakesh Mashid and Amit Barai under section 353 IPC sub-section 65 (a), 98 (2), 83 Madaka sub-section 184 Mowaka and the accused named Amit Barai has been arrested. .
The action was taken by Superintendent of Police Nilotpal, Additional Superintendent of Police (Administration) Kumar Chinta, Additional Superintendent of Police (Campaign) Anuj Tare. And Additional Superintendent of Police Aheri Yatish Deshmukh Sa. Under the guidance of Police Inspector Ulhas Bhusari of Local Crime Branch, Gadchiroli Poupani Rahul Awad, Poupani Deepak Kumbhare, Napoam/ Akbar Poyam, Poam/ Prashant Garphade, Srikant Boina, Shrikrishna Parchake, Mangesh Raut, Sunil Putthawar, Sachin Ghubde, Chanapoam/ Manohar. Yelam, by Shagir Shaikh.
गडचिरोली पोलीस दलाची अवैध दारु विक्री विरोधात मोठी कारवाई : १७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त
By The Gadvishva -March 30, 2023484
गडचिरोली, ३० मार्च : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सिनेस्टाईलने पाठलाग करत वाहनासह तब्बल १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २९ मार्च रोजी रात्रोच्या सुमारास केली. या प्रकरणी वाहनचालका सोबत असलेला अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यास ताब्यात घेण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली ला चामोर्शी हद्दीतील दारु तस्कर शंकर अन्ना हा त्याचे सहकाऱ्यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्हयातून मोठया प्रमाणात दारुची खेप आणणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्रोदरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली. दरम्यान दारु वाहतुक करीत असलेल्या पिक अप वॅनने पोलीसांच्या इशाऱ्यास न जुमानता बॅरिकेटस तोडुन पळ काढला परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. यावेळी अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्याचे ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोर्शी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळ्या गावात नेले. परंतु पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्टे चामोर्शी हद्दीतील सोनापुर या गावाजवळ सोडुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन वाहनचालका सोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यांस ताब्यात घेतले परंतु वाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोर्शी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला.
सदर वाहनात देशी दारुच्या १३९ पेट्या व विदेशी दारुच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असे १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. याप्रकरणी पोस्टे चामोर्शी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ), ९८ (२), ८३ मदाका सहकलम १८४ मोवाका अन्वये आरोपी शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन आरोपी नामे अमीत बारई यांस अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. व अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, नापोअं/ अकबर पोयाम, पोअं/ प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुट्ठावार, सचिन घुबडे, चानापोअं / मनोहर येलम, शगीर शेख यांनी केलेली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....