ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख त्यांची स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशभाऊ बगमारे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या मनिषाताई बगमारे कॉलेजच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, नीलिमा गुजेवार ,गोवर्धन दोनाडकर, निशा ठाकरे ,अश्विता सयाम,प्रगती शेंडे, पालक हरबाजी शेंडे,अंकुश ठाकरे, जयघोष सहारे, राजेंद्र चौधरी,कामिनी कन्नमवार, घर्षना सेलोकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.पंजाबराव देशमुख तथा भाऊसाहेब यांनी समाजकार्य करीत असताना कुठल्याही जाती व धर्म यांचा विचार केलेला नाही. तर नेहमी निस्वार्थ पणे सेवा करण्याचे कार्य केले. तर भाऊसाहेब हे हाडाचे शेतकरी होते पण डॉ.पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार लोभा घोरमोडे यांनी केले.