वाशिम : जागतीक तापमान वाढीचा परिणामामुळे या वर्षीचे उन्हाळयातील तापमान नेहमीच्या सरासरी
तापमानापेक्षा किमान 1-2 अंश से. जास्त आहे. त्यामुळे पशुधनास सद्यस्थितीत तोंड द्यावे लागत आहे.
वातावरणातील तापमान वाढीचे प्रमाण पशुधनाच्या शरीर क्रीयेवर होऊन पशुधन आजारी पडु शकते
किंवा दगावण्याची शक्यता असते त्यास उष्माघात किंवा उष्म लहरी म्हटले जाते. एखाद्या भुभागात/भौगोलीक
क्षेत्रात उष्णलहरी असतांना वातावरणातील तापमान त्याकाळातील नियमीत सरासरी तापमानापेक्षा किमाण 1-2 अंश सें. किंवा जास्त तापमान सलग 3 दिवसासाठी किंवा जास्त कालावधीसाठी असु शकते. यामुळे पशुधनाच्या शरिरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होउन निर्जलीकरण होते. तसेच चारा व खाद्य
खाण्याचे प्रमाण कमी होउन त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो .
उष्णलहरी पासुन बचाव व उष्ण तापमानास जुळवुन घेण्यासाठी पशुधनास खालील
प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रथमोपचार व पशुवैद्यकीय उपाययोजना कराव्यात.
उष्णलहरी पासुन होणा-या
आजारापासुन पशुधनाचा बचाव करणे. थंड तापमानातुन पशुधनास थेट उष्ण तापमानात नेण्याचे टाळावे.
पशुधनास फक्त दिवसाच्या थंडवेळी चरावयास सोडावे व उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात
ठेवावे पशुधनास वाढत्या तापमाणाची हळुहळु सवय लावावी
लहान वासरे ,करडे, काळया अथवा गडद रंगाचे प्राणी, श्वासाच्या आजाराने ग्रस्त अथवा आजारी
पशुधन, वराह,दुभते जनावरे अशा पशुधनास व कुक्कूट पक्षांना उष्माघाताचा जास्त धोका असतो.
उष्माघात किंवा उष्मलहरीच्या प्रकोपाचा प्रभाव झालेले पशुधन ओळखणे अत्यंत महत्वाचे असते. अशा
पशुधनात धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट
, पशुधन सुस्तावते, लाळ गाळते, नाकपुडया कोरडया पडतात, पशुधनाच्या शरिरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होते.अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाण्याशी संपर्क साधून उपचार करुन घेण्यात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अरुण यादगिरे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....