अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध जनजागृतीपर कार्यक्रम निरंतर केले जात आहेत . *त्याचाच एक भाग म्हणजे दि.२७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवासाठी संगीतमय दृष्टी गणेशा कार्यक्रम दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आयोजित केला आहे . सदर कार्यक्रम संस्था गेल्या १२ वर्षापासून करीत असून या संगीतमय कार्यक्रमात दिव्यांग कलावंत आपली कला प्रस्तुत करतात . या कार्यक्रमात मराठी हिंदी भक्ती गीते , गणेश वंदना , आरती व अवयवदानावरील जनजागृती पर गीतांचा समावेश केला जातो . संस्थेतर्फे अकोला जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात या कार्यक्रमाची प्रस्तुती केली जाते या कार्यक्रमात रक्तदान , नेत्रदान , निसर्ग संवर्धन , प्लास्टिक बंदी , स्त्री शिक्षण , दिव्यांगांच्या समस्या इत्यादी विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम केले जातात . दिव्यांगांच्या कला प्रस्तुती बरोबरच अकोल्यातील नेत्रतज्ञ डॉ.नितीन उपाध्ये , दंतचिकित्सक डॉ.विद्या जयसवाल , योग प्रशिक्षक भारती शेंडे , आयुर्वेदाचार्य डॉ.राजेश भोंडे , गायक डॉ.विशाल कोरडे , संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अरविंद देव व सहसचिव डॉ.संजय तिडके यांचेही प्रबोधन पर व्याख्यान गणेश भक्तांसाठी आयोजित करण्यात येणार आहे . या कार्यक्रमात रक्तदात्यांची नोंदणी केली जाणार असून शेवटच्या दिवशी रक्तदान केले जाणार आहे . *या जनजागृती पर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने करावे या कार्यक्रमाच्या नि:शुल्क नोंदणीसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा* असे आव्हान आयोजन समितीचे अस्मिता मिश्रा,रुपेश पत्की, दुर्गा दुगाने, अनामिका देशपांडे , विजय कोरडे, तन्वी दळवे, सारिका उगले , जिया खेतान , नेहा पलन व अदिती वाडे यांनी केले आहे .