कारंजा : जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व तहसील कार्यालय कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे,तहसीलदार कुणाल झाल्टे,तालुका नोडल अधिकारी(स्वीप) तथा गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने,मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार कुणाल झाल्टे तर प्रमुख उपस्थितीत तालुका नोडल अधिकारी(स्वीप) तथा गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, नोडल ऑफिसर प्रशांत वाहाळे,पर्यवेक्षक विनोद नागलकर गजानन पवार उपस्थित होते.कुणाल झाल्टे यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्या सोबतच महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.आपणही सर्वानी प्रयत्न करावे.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून मतदानाची झाली घाई माझ्या बोटाला लावा शाई असा संदेश गावकऱ्याना दिला.भारत हा भक्कम लोकशाही असलेला देश आहे. मतदानाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती. व्हावी,चांगले,आदर्श व सुशिक्षित उमेदवार निवडून यावेत,मतदानाची टक्केवारी वाढावी याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.तसेच मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे असे आवाहनही केले.हक्काविषयी जसे आपण जागरूक असतो तसे आपण कर्तव्या विषयी जागरूक असेल पाहीजे असेही पथनाटयातून सांगण्यात आले.पल्लवी पानझाडे,रोशन वरणकार,जयेश पुंडकर,हर्षवर्धन खंडारे,साची डोंगरदिवे,चैताली तुमसरे,जानवी डेरे,विदिशा लाकडे,यश बांते,अमृता घोडसाळ
वेदांत कोराट, वैभवी खैरकर, नेहा मोरे,दिव्या परते, गौरी चोरे,अनन्या घुले,श्रावणी राठोड, आरुषी भुजाडे, अभय जुननकार यांनी पथनाट्यात प्रमुख भूमिका केल्या.पथनाट्य लेखन दिग्दर्शन गोपाल खाडे यांनी केले. मनोरंजनातून अंजन घालण्याचं काम पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केले. यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीला कुणाल झाल्टे आणि श्रीकांत माने व उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा परिषद शाळा मुलांची जिल्हा परिषद शाळा मुलींची जिल्हा परिषद उर्दू शाळा कामरगाव येथील मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद उपस्थित होते.
मुख्याध्यापक शिक्षक वृंद कामरगावातील सर्व बि.एल.ओ. यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करता प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड तर सूत्रसंचालन अरुण चव्हाण यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....