चंद्रपूर : संतंतधार कोसळलेल्या पावसामुळे निघालेल्या तलावाच्या वेस्टवेअर मध्ये पोहताना वाहून गेलेल्या एका मित्राला वाचविण्याच्या नादात दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (29 जुलै) ला चंद्रपूर पासून जवळच असलेल्या जुनून तलावावर घडली. नंदलाल कैथवास असे मृतक मित्राचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार, काल शुक्रवारी चंद्रपूर पासून जवळच असलेल्या जुनोना येथील तिघे मित्र गावालगच्या तलावावर गेले होते. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत. वेस्टवेअर मधून भरमसाठ पाणी बाहेर फेकल्या जात आहे. जुनोना तलावाचाही ओव्हरफ्लो झाला असून वेस्टवेअर मधून तेजगतीने पाणी बाहेर पडत आहे.
जुनोना तलावाच्या वेस्वेअरवर काल शुक्रवारी तिघे मित्र गेले असता त्यांना त्या ठिकाणी पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तिघेहीजण पोहोत असताना त्यापैकी एकजण वेस्टवेअर मधील पाण्यामधून वाहून गेला आणि लगतच्या झुडपात अडकला. बराच वेळ तो त्या ठिकाणी अडकून असल्यामुळे इतर दोघे मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नंदलाल कैथवास त्याला वाचवित असताना तोही वेस्ट वेअर मधून वाहून गेला. यामध्ये नंदलालचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती जुनोनावासीयांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आणि सुरुवातीला वाहून गेलेला आणि झुडपात अडकून असलेल्या त्या मित्राला वाचविण्यात नागरिकांना यश आले.
मात्र त्याला वाचवण्याच्या प्रयत्न करणारा नंदलाल कैथवास याला वाचविणा आले नाही. तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सदर माहिती घटनेची माहिती पोलिसांना होतात त्यांनी घटनास्थळी भेट दिली. वेस्ट वेअर मधून वाहून गेलेल्या त्या मित्राचा मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणी करता पाठविण्यात आलेला आहे.