कारंजा : - जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये,शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे पोलीस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी मोबाईल चोरीचा तात्काळ शोध घेणारी यंत्रणा - सि ई आय आर ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले असून, विशेष म्हणजे सदर पोर्टलची देखरेख स्वत: पोलीस निरिक्षक आधार सिंग सोनोने हे करणार असून, सदर पोर्टलचे कामकाज पो. कॉ. वैभव सिद्धेश्वर गाडवे ब. न. 1464 हे बघणार आहेत.
पोलीस स्टेशनला दैनंदिन गहाळ झालेल्या तक्रारी प्राप्त होताच सदरच्या तक्रारी तक्रारदारांकडून नोंदवून सि ई आय आर ऑनलाईन पोर्टलला टाकून मोबाईलचा शोध सात दिवसात घेऊन, संबधित व्यक्तिकडून हस्तगत करीत तक्रारदाराला परत केल्या जातो. वरील यंत्रणेकडे दि १ जाने २०२३ ते १८ एप्रिल २०२३ पर्यंत ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असतांना, पो.कॉ. वैभव सिध्देश्वर गाडब बं.न.1464 यांनी कायदेशीर कार्यवाही करीत एकूण ३० मोबाईल हस्तगत करून संबधित तक्रारदारांना परत केले असून,कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे. तरी यापुढे जनतेने आपले मोबाईल गहाळ झाल्यास, मोबाईलच्या संपूर्ण कागदपत्रासह कारंजा शहर पोलीस स्टेशनला रितसर नोंदवावी. नागरीकाच्या तक्रारीची योग्य दखल घेतल्या जाणार असल्याचे पोलीस निरिक्षक आधारासिंग सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.