ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन विद्यार्थींचा पाठलाग करत रात्रौच्या वेळेस तिच्या घरी घुसल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकावर ब्रम्हपुरी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्ह्यांची दाखल केला आहे. अवेझ शेख असे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेेल्या शिक्षकाचे नांव आहे.
ब्रम्हपुरी येथील एका नामांकित खाजगी शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक असलेल्या अवेझ शेख वय 25 वर्षे रा. आंबेडकर वार्ड ब्रम्हपुरी याने पीडित अल्पवयीन मुलीला इंग्रजी विषय शिकवित असल्याची माहिती आहे. आरोपी शिक्षक पीडित मुलीला मेसेज करत होता कधी कधी तिचा पाठलागही करत होता. 19 जुर्ले रोजी आरोपी शिक्षक रात्रौच्या वेळेस मुलीच्या घरी घुसला सदर बाब मुलीच्या घरच्यांना लक्षात येताच तो तिथुन पडून गेला.
कुटुंबियांच्या तक्रारीवरून अवेझ शेख या शिक्षकाविरोधात ब्रम्हपुरी पोलिसांनी कलम 354 (ड) 452 सहकलम 12 पॉस्को अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहे.