वरोरा:-
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. असेच देशसेवा करु सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा आपल्या कुटुंबात सुखरूप परत आल्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर बोर्डा येथील माजी सैनिकांचा ग्राम पंचायत बोर्डा कडून शाल व श्रीफळ देत सन्मान करण्यात आला.
वरोरा तालुक्यातील जे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श सर्व नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या विधायक हेतूने निवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचे काम ग्राम पंचायत बोर्डा कडून सन्मान सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरिक,माजी सैनिक पत्नी सरपंच सौ. ऐश्वर्यताई खामनकार ,सुभाष ताजने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
असा झाला सन्मान जिल्हा परिषद शाळा बोर्डा च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुरेश बोभाटे,वामन राजूरकर,,विनोद डोंगरे,निलेश पावडे,नागो कुंभारे,ऋषि हजारे,विठ्ठल दानव,वसंत खामनकर,शेषराव कडुकर,रुपेश कुत्तरमारे,प्रकाश चिकटे,विलास जीवतोडे,दौलत ढोके,योगेश ठेंगणे,गणेश मडावी,कल्याण गायकवाड,रमेश हक्के,सदाशिव जुनघरे,गणेश धोबे,गोपीचंद बिहादे,मारोती सरपाते,भगत, अनिल जीवतोडे,भास्कर बनसोड,विठ्ठल चार्लीकर,श्रीवास्तव व बागेसर या सर्व माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सौ .ऐश्वर्या खामनकार,ग्राम पंचायत सदस्या सौ. प्रतिभा कातकर,सौ. भाग्यश्री इंगळे,सौ .नंदा हिवरकर, सौ.प्रतिभा जीवतोडे,श्री.भूषण बुरील,श्री.रवींद्र बगडे, श्री.आनंद वानखेडे ग्राम विकास अधिकारी सुभाष ताजने,लिपिक धनराज रामटेके,शिपाई श्रीकांत परचाके ,बोभाटे,तोडासे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त भारतीय सैनिकांचा सार्थ अभिमान आपल्या देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या बहाद्दर सैनिकांचा आपुलकीने सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, या सैनिकांचा आम्हाला गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्यात चांगली सेवा देवून नुकतेच सेवानिवृत्त होवून सुखरूपपणे आपल्या कुटुंबात परत आले,
त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती व्हावे.
सुरेश बोभाटे
माजी सैनिक
आपल्या प्रतिक्रिया द्या....