सबहेड - जागतिक महिला दिनानिमित्त फुले आंबेडकर साळवे साठे मंचचा आगळा-वेळा ऐतिहासिक कार्यक्रम
अकोला - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फुले आंबेडकर साळवे साठे सार्वजनिक विकास मंच तर्फे दरवर्षीप्रमाणे विविध कार्यात काम करणाऱ्या शौर्यविर महिलांचा सत्काराचा कार्यक्रम 12 मार्च 2025 रोजी डॉ मिनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला तसेच अकोट फैल पोलीस स्टेशनच्या प्रमुख उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर सभागृह येथे मोठ्या खेळीमेळीच्या आनंदमय वातावरणात संपन्न झाला. सर्वप्रथम नागनबाई ओव्हाळ यांच्या हस्ते डॉ. मिनाक्षी गजभिये यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला. त्यानंतर अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे यांचा सुद्धा नागनबाई ओवाळ यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.
आंबेडकर साळवे साठे मंचच्या निडर धाडसी कार्यकत्यांनी अटीतटीची लढाई जिंकून जागा मिळवून देणाऱ्या शौर्यविर महिलांचा डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम कमल उर्फ सुनिता वाघमारे या विधवा महिलेने अकोट फैल येथील चौरसिया नामक कंट्रोल वाल्याने सुनिता वाघमारेला 4 वर्षापासून धान्याचा वाटप न करता धान्य हडपणाऱ्या कंट्रोलवाल्याकडून 4 वर्षांचे गहू तांदूळ साखरेसह घासलेट गिळंकृत केलेले 4 वर्षांचे धान्य वसुल केले सोबत व त्यानंतर धाडसी करणाऱ्या सुनिता वाघमारेचा सत्कार डॉ. मिनाक्षी गजभिये यांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर कलावती बिहुल गोरे यांनी गांधी चौकातील एका दुकानदाराने कलावती मोरे यांनी 500 रुपयाची नकली नोट देऊन फसवणुक केल्याबद्दल कलावती मोरे यांनी सिटी कोतबली पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्या सोबतच असली 500 रु. नोट जिद्द व चिकाटीने घेऊन नारी शक्तीचा धसका दाखविल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे यांनी सत्कार केला. यानंतर सरस्वती लक्ष्मण मिसाळ या महिलेने आपल्या पतीसोबत गणेश विसर्जनच्या एक दिवस आधी रात्रभर जाने वहून अण्णाभाऊ साठे नगरात 24 तासाचे आत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तयार करून नारी शक्तीची ताकद दाखवून देणाऱ्या सरस्वती लक्ष्मण मिसाळचा सत्कार गजभिये मॅडम यांनी केला. या कार्यक्रमाला फुले आंबेडकर साळवे साठे विकास मंचच्या महिला अध्यक्षा गुंफबाई गोरे, बायडा साठे, मालन गालफाडे, नागनबाई ओव्हाळ, दिपा अवताडे, अंजना गायकवाड, शोभा सोनोने, कलावती मोरे, लिलाबाई ठोसर, सोनी भालेराव, बेबीबाई कांबळे, दिपा कांबळे, सुनिता वाघमारे, सुनिता तुपीरे, संध्या शिंदे, दिपाली गायकवाड, सरस्वती मिसाळ, शेख कदीर कुरेशी, अशोक साळवे, सुखदेव गाडे, दिलीप चव्हाण, गौतम मैटणे, महादेव राऊत,
याहया खान पठाण, सुशिल साळवे, गणेश वाकोडे, अश्विन भांगे, आकाश रगडे, अशोक सोनोने, संजय शिंदे, अनंत साळवे आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....