कारंजा (लाड) : कारंजा येथील भाजपाचे भिष्माचार्य नरेंद्र गोलेच्छा व भाजपाचे देशपातळीवरील सर्वोच्च नेते मा. नितीनजी गडकरी हे संघपरिवारातील जुने परम मित्र असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा कारंजेकरांना अनुभवयाला मिळाला आहे.याबाबत आमचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविलेले अधिक वृत्त असे की,केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी परिवारासह आपले आराध्यदैवत श्री. गुरुमाऊली श्री.नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाचे दर्शनार्थ आले असता त्यांनी त्यांच्या नियोजित वेळेतून वेळात वेळ काढून वाशीम जिल्ह्याचे भाजपाचे भिष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा यांच्या सोबत असलेल्या अगदी जनसंघापासूनच्या जुन्या ऋणानुबंधाची जाण ठेवून, स्वेच्छेने नरेंद्र गोलेच्छा यांच्या निवासस्थानी दि. 23/11/2023 रोजी सदिच्छा भेट दिली असता नरेंद्र गोलेच्छा व परिवाराकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नरेंद्र गोलेच्छा यांच्यावर प्रेम करणारे असंख्य भाजप कार्यकर्ते शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. याप्रसंगी कारंजातील विदर्भ कँसर रिलिफ सेंटरचे अध्यक्ष शेखर भाऊ बंग तसेच अशोकसेठ इन्नानी यांच्यासह डॉक्टर मंडळीनी मा. नितीनजी गडकरी यांना विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरच्या कार्याची माहीती देऊन त्यांच्याकडे कारंजा पंचक्रोशीतील कॅन्सर व इतर आजारग्रस्तांवर वैद्यकिय उपचार सेवा बद्दल निवेदन देऊन सहकार्याच्या दृष्टिने सकारात्मक चर्चा केली असता मा नितीनजी गडकरी यांनी पूर्ण सहकार्य करण्याबाबत होकार देऊन आश्वासीत केले. यावेळी गोलेच्छा परिवारातील सदस्य आ. राजेंद्र पाटणी , माजी आ.विजयराव जाधव, शहर भाजपा अध्यक्ष ललित सेठ चांडक , तालुका भाजपा अध्यक्ष डॉ. राजीव पाटील काळे तसेच असंख्य नागरिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.असे वृत्त मिळाले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.