{जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी, तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन, 1 नोव्हबर 2005 च्या शासन निर्णयांची केली होळी, दिवसभर काळ्या फित लाऊन कुटुंबियासह व्यक्त केला निषेध}
कारंजा : दिनांक 01 नोव्हबर 2023 रोजी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी या ठिकानी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने सौ संगीता ताई शिंदे यांचे मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
३१ आक्टोबंर २००५ चा शासन निर्णयाने जो कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे,पेंशन पासून वंचित ठेवले आहे म्हणून त्या शासन निर्णयाचा निषेध केला, शिक्षणाधिकारी कार्यालया समोर त्यांची होळी केली. वाशिम जिल्हाभर 2005 पूर्वीच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी निषेध दिन म्हणून सर्वांनी दिवसभर काळ्याफिती लावून काम केले तसेच कुटुबियानी सुद्धा काळ्या फित लाऊन निषेध नोदवला. वाशिम येथील जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी तसेच कारंजा,रिसोड,मंगरूल येथील तहसीलदार व गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेत.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर 2021 ते 8 मे पर्यंत एकूण 140 दिवस आझाद मैदानावर बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलन केले होते परंतु तत्कालीन शासनाकडून आश्वासनाच्या पलीकडे व वेळ काढू धोरणाच्या पुढे काहीही पदरात पडले नाही. त्यामुळे आता हे सर्व कर्मचारी आक्रमक बनलेले आहेत जुनी पेन्शन हा आमचा व आमच्या कुटुंबाचा म्हातारपणीचा आधार असून राज्यातील १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्ती असलेल्या सर्व विनाअनुदानित ,अंशतः अनुदानित व तुकड्यावर नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विना अट लागू करावी, अन्यथा यापुढे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा मानस सर्व कर्मचाऱ्यांचा आहे,असे मत शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष विजय भड यानी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना याबाबत निवेदन देताना जुनी पेन्शन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवर,सचिव नितेश भिंगे, कार्याध्यक्ष विजय भड,कारंजा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे, डी.डी.शिंदे,सज्जन बाजड, गणेश ठाकरे, संतोष वानखडे,यू. एन. खिराडे, शिवाजी माधवराव इंगले,वाय जी. हीवराळे,ए.एच. सुर्वे, संदिप दत्तराव देशमुख, व्ही. की गवळी,आर. यू. अंभोरे, एस. आर. वानखेडे, व्ही.के खिल्लारे, बी.पी. टापरे इत्यादी पेन्शन फायटरची उपस्थिती होती.