शेतकऱ्यांच्या सोयाबीन विक्रीच्या संबंधाने असलेल्या अडचणी लक्षात घेऊन लाखनवाडा येथील सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर आमदार रणधीर सावरकर यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन खरीदार कंपनीला आवश्यक त्या सूचना केल्या....
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीनची जलद गतीने विक्री व्हावी, याकरीता शासनाने शेतकऱ्याना नोंदणी करीता दि. ६ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे ,या मुदत वाढीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन सोयाबीनची विक्री करावी सोबतच सोयाबीन खरीदार कंपनीने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी कोणताही शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा निर्देश आमदार रणधीरसावरकर यांनी लाखनवाडा येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर भेट देऊन संबंधित यंत्रणाना दिले. आज दि.२ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया खंडित झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असता ती नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी याकरिता आमदार सावरकरांनी यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना सूचना दिल्या असता अर्ध्या तासाचे आत ऑनलाईन ची नोंदणी पुनश्च पुर्ववत सुरू केली, आज लाखनवाडा केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांग लागली असता तसेच गोडाऊनमध्ये जागा नाही या सबबीवर खरेदी प्रक्रिया बाधीत झाल्यावर शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या होत्या ,शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या सोडवून घेण्याकरिता आमदार सावरकर यांनी तातडीने लाखनवाडा येथील पाळधी फार्मर प्रोड्यूस कंपनी यांच्या यंत्रणेच्या खरेदी केंद्रावर भेट देऊन केंद्र प्रभारी यांना आवश्यक सूचना केल्या ,सोयाबीनची खरेदी वाढवा तसेच शासनाने नोंदणी वाढीसाठी दिलेल्या मुदतीचा लाभ घ्या , तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना कोणताही शेतकरी सोयाबीन विक्री पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावीअसे निर्देश दिले, अंबादास उमाळे डॉक्टर शंकरराव वाकोडे, माधव मानकर दिलीप मिश्रा जयंत मसने विठ्ठल चतरकर, राजेश ठाकरे रवी गावंडे, किरण थोरात, एडवोकेट अभय थोरात, गणेश तायडे किशोर कुचके विपुल घोगरे, राजेश बेले, पंकज वाडी वाले, वसंतराव गावंडे, अनमोल गावंडे, अनिल गावंडे, संदीप गावंडे, अमोल गीते, गणेश अंधारे गोपाल मुळे वैभव माहोरे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.