ब्रह्मपुरी... ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी बुधवारला श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन (खरकाडा)नवीन आबादी यांच्या सौजन्याने रात्रो ८ वाजता विदर्भ स्तरीय भव्य खुली खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ व्यासपीठ येथे करण्यात आले आहे. या खंजिरी भजन स्पर्धेसाठी पहिले बक्षीस (पुरुष गट) २१,००१ दुसरे बक्षीस १५,००१ तिसरे बक्षीस ११,००१चवथे बक्षीस ९,००१पाचवे बक्षीस ७,००१सहावे बक्षीस ५,००१ सातवे बक्षीस ३,००१ठेवण्यात आले तर महिला गटासाठी पहिले बक्षीस ७,००१ दुसरे बक्षीस ५,००१ तिसरे बक्षीस ३,००१ चौथे २००१ पाचवे बक्षीस१००१ बक्षीस आकारण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन(नवीन आबादी) तर्फे कळविण्यात आली आहे.