कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) चालू आठवडयातील पावसामुळे, त्यापूर्वी नुकतीच पेरणी झालेल्या पिकांना नवसंजिवनी मिळत असल्याचे दिसून येत असतांनाच आता एकीकळे बरडावरच्या शेतजमिनी बहरत आहेत.तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या नदी,नाल्याच्या काठच्या आणि डाबरीतल्या जमिनी खरडून जात असल्याचे विदारक चित्र हाती येत असून, आता तर दररोजच्या पावसाला शेतकरी व ग्रामस्थ कंटाळला आहे. कारण सततधार पावसामुळे शेतातील डवरणी निंदणाचे कामे त्याला करता येत नाही. व शेतात जर डवरे आणि निंदनाची कामे झाली नाहीत. तर पिकामध्ये तण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बळीराजा पावसाने उसंत द्यावी. अशी याचना करीत आहे .