शहरातील कॉलरी वाडीतील रहिवासी नाजिर अली शौकत अली सय्यद, वय ४० याचा आज दी.२७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास शेतातील विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला.
वरोरा-वणी मार्गावर असलेल्या रमेश तांनबाजी घाटे यांच्या शेतमागील असलेल्या शेतात रोजंदारीवर काम करीत होता,हे शेत अशपाक आरिफ शेख यांनी ठेक्याने घेतले होते,दुपारचे काम आटपून आपल्या राहते घरी कॉलरी वार्ड येथे जात असताना जनावरांसाठी लावण्यात आलेल्या शेतातील विद्युत तारेचा धक्का बसला बसला त्यात तो गतप्राण झाला,पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, मृतकास शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले,या घटनेचा तपास पोलीस स्टेशन वरोरा करीत असून झालेल्या प्रकारावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.