कारंजा - अखिल लोककला कल्चरर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया च्या पुणे शाखेतर्फे नृत्य नाट्य वादन आणि गायन स्पर्धा दि १६ .०५.२०२४ ते २२.०५.२०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले सदर स्पर्धा ही सलग ६ दिवस चालली व या स्पर्धेत २४ राज्यातील एकूण २५३७ स्पर्धकांनी आपली कला सादर केली सदर स्पर्धेत कारंजा येथील ए एस डान्स अकॅडमी च्या विद्यार्थीनींनी पहिल्यांदाच सहभाग नोंदविला ग्रुप डान्स मध्ये भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ज्ञानेश्वरी मुंदे, सिद्धी मुक्कीरवार,राशिका धोंडे यांच्या चमूने तृतीय क्रमांक पटकावला तर सोलो डान्स मध्ये सेमी क्लासिकल या नृत्य प्रकारात चिन्मयी मांगलकर हीने तृतीय क्रमांक तर एक एस डान्स अकॅडमी च्या डान्स गुरू शितल उजवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या स्पर्धकांची निवड ऑगस्ट मध्ये थायलंड येथे होणाऱ्या पुढील इंटरनॅशनल लेवल साठी करण्यात आली त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांवर त्यांचे कौतुक करण्यात येत आहे .या यशाचे श्रेय विद्यार्थीनींनी डान्स गुरू शितल उजवणे व आई वडीलांना दिले आहे.असे वृत्त मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.