विवेकानंद ज्युनिअर कॉलेज गडचिरोली येथे वर्ग 12 वीमध्ये शिक्षण घेत असलेला मूळ गाव जांभळी येथील अवघ्या वयाच्या 17 वर्षात नागपूर विभागीय ज्यूडो कराटेत सुवर्ण यश संपादन केले आहे.
मौजा जांभळी ता.आरमोरी येथील मूळ रहिवाशी सद्या कोटगुल गडचिरोली येथे स्थायी झालेले व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री करण हूर्रा यांचा मुलगा धीरज करण हुर्रा याने गोंदिया जिल्ह्यात मरारटोली येथे दिनांक 10/10/2023 ते 11/10/2023 पर्यंत आयोजित केलेल्या नागपूर विभागीय ज्युडो कराटेच्या वयोगट 60/70 मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
त्याचे कौतुक पोलीस मुख्यालयाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मोरेश्वर लोहारे, पोलीस उपनिरिक्षक दिवाकर सहारे,तसेच पोलीस हवालदार व पोलीस कर्मचारीकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक दिवाकर सहारे यांनी केले व उपस्थितांनी कौतुक करुन वडील व मुलाचे अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या मानात वाढ केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.