कारंजा (लाड) : नाथ समाजाच्या विकासासाठी महायुती सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजीत पवार यांचेमार्फत, नाथ समाज आर्थिक विकास महामंडळाला मंजूरात मिळवून घेणारे, नाथ समाजाचे केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक कार्यकर्ते,वैदर्भिय नाथ समाज संघ तथा वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि साप्ताहिक नाथांजली वृत्तपत्राचे संपादक एकनाथराव पवार हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजाचे आधारस्तंभ सुद्धा आहेत.त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजाचे वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पत्रकार संघ कार्यालयात अभिष्ट चिंतन सोहळा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी, जिल्हाध्यक्ष किरण क्षार,विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सी पी शेकूवाले, शहर अध्यक्ष नितीन वाणी,तालुकाध्यक्ष मोहम्मद मुन्निवाले, समिर देशपांडे, अमोल अघम, मुख्याध्यापक विजय भड, विजय गागरे, गोपाल पाटील कडू इत्यादींनी सत्कार मूर्ती एकनाथ पवार यांचे अभिनंदन केले.