संजय कडोळे ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी ) संपर्क :९०७५६३५३३८ .
कारंजा : तीस वर्ष कारंजा पोलिस स्टेशन द्वारे, हिंदु मुस्लिम बांधवाचे ऐक्य व सलोखा कायम ठेवून राष्ट्रीय एकात्मता जपण्याकरीता जीवन समर्पित करणारे मेजर प्रदिप ठाकरे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या स्थानी रुजु झालेले पोलिस हवालदार उमेश चचाणे यांनी सुद्धा पोलीस गुप्तचर विभागामध्ये उत्तम कामगीरी करीत येथे शांती व सलोखा प्रस्थापित करण्यावरच भर दिलेला आहे. त्यांचे व शांतता कमेटी सदस्य आणि पत्रकार बांधवाचे मैत्रीपूर्ण संबध आहेत.त्याची दखल घेत महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद आणि कारंजा पत्रकार मंचाने उमेश चचाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधीत, कारंजा शहर पोलिस स्टेशनला जाऊन, पुष्पगुच्छ देऊन व पेढे वाटून सहर्ष अभिनंदन केले आहे. यावेळी महाराष्ट्र साप्ता ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त एकमेव ज्येष्ठ पत्रकार, संजय कडोळे, कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष दिलीप पाटील रोकडे, कारंजा मेट्रोचे संपादक विलास राऊत, विजय पाटील खंडार, अनिकेत भेलांडे इ. हजर होते .