कारंजा : कारंजा येथील आदर्श समाजसेविका सौ.शारदा भुयार ह्या अनेक वर्षांपासून मैत्रीणीच्या सहकार्यातून,मेळघाट ह्या दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासींसोबत आपली दिवाळी साजरी करीत असतात.स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.यावर्षी नुकतेच त्यांनी मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात जाऊ दाखवुन दिले की, आम्ही महिला प्रेमाची भिंत कुठेही बांधु शकतो.त्यांनी दुर्गम अशा भागातील वंचिताची दिवाळी गोड व्हावी.कारंजा शहरातुन अतिदुर्गम भागात जाऊन आदिवासी महिला,लहान मुले,वयोवृद्ध यांना कपडे, स्वेटर,ब्लॅकेट,अन्नधान्याची पाकीटे,दिपावली मिष्टान्नाचे फराळ वाटून निरागसाच्या चेहर्यावर आनंद व हास्य फुलविण्याचे काम केले.

स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अध्यक्षा सौ शारदा अतुल भुयार. यांना त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवी कार्याकरीता संघटनेतील कार्यकर्त्या उत्साही मैत्रिणी तालुका संघटिका राधा मुरकुटे,संघटनेच्या सौ.कृपा ठाकरे सदस्या अनिता राऊत ,सदस्या सौ सुभाषिनी रंगदळ ,सदस्या यमुना राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. या समाजसेवी उपक्रमात दिवाळी निमित्त अनेकांनी मदतीचा हात पुढे केला जे जमेल ते सढळ हाताने मदत केले. अँड. संदेश जिंतूरकर ,सुराना किराणा कारंजा यांना नविन कापड व किराणा तसेच पुनम ठाकुर,विद्या पवार,शीला चिवरकर,राधा मुरकुटे,मोनाली मुरकुटे इ महिलांनी दुकानातील नविन कपडे,भांडे,फराळाचे पदार्थ देऊन मोलाचे सहकार्य केले.
मेळघाट परिसरातील बिहाली,घंटाग या दोन आदिवासी गावांमध्ये सहकार्याचे वाटप करण्यात आले.दोनही गावातील लोकांनी सहकार्य केले.
या शुभप्रसंगी मेळघाटातील बिहाली येथील सरपंच बददु कासदेकर, वनरक्षक आर.यु. मकेश्वर सर घंटाग गावातील वनरक्षक अधिकारी,राजेश गणेशराव गायकी सर,घंटाग गावातील वनरक्षक सुमुरति मावसकर, वनरक्षक शांती बेटेकर, पी.पी.बावसकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कारंजा येथील वाहन चालक गणेश चव्हाण यांचेही विशेष सहाय्य मिळाले. सौ.शारदा अतुल भुयार यांच्या स्तुत्य अशा समाजसेवी उपक्रमाची कारंजा येथे चांगलीच चर्चा असून सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....