कारंजा (लाड) : दिप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत अमृतयोगावर,कडोळे परिवाराच्या वतीने,विदर्भ लोककलावंत संघटनेच्या सहकार्याने,श्री सिद्ध रामनाथ महाराज संस्थान रामगाव (रामेश्वर) मठाचे मठाधिश श्री. अभेद्यनाथ गुरु सेवानाथ यांच्या आशिर्वादाने,श्री मार्तंड नाथ गुरू अभेद्यनाथ आदी संतमंडळीच्या प्रमुख उपस्थितीत,स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ,उत्तरवाहिनी अडाणच्या त्रिवेणी संगमावर, शिवपूजनाचा कार्यक्रम होऊन, महर्षी वाल्मिकी भजनी मंडळ दिघी ता.कारंजा,श्री.गुरुदेव सेवा मंडळ कारंजा,श्री.आसरा माता भजनी मंडळ,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या भजनी मंडळाचा, श्री.रामनाथ भजनामृत सेवा कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर श्री.रामनाथ महाराजांचे पूजन व महाआरती घेण्यात येवून,स्व. उमेश मधुकरराव कडोळे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात येवून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदिप वानखडे ठाकुर यांनी केले.यावेळी बोलतांना श्री.मार्तंडनाथ गुरू अभेद्यनाथ म्हणाले, "न्यायालयीन कर्मचारी असलेले स्व.उमेश कडोळे हे धार्मिक आध्यात्मिक विचार सरणीचे असल्यामुळेच, ह्या हजारो वर्ष पुरातन असलेल्या,पवित्र पावन ऐतिहासिक तिर्थक्षेत्री,संत मंडळीची चाळीसावी साजरी होते. अगदी त्याच स्वरूपात स्व. उमेश कडोळे यांच्या मोक्षप्राप्तीसाठी हा कार्यक्रम होत आहे.हा पवित्र सोहळा प्रत्यक्ष स्वर्गातील सर्व देवी देवता पहात असून,त्यांना परमात्म्याच्या सान्निध्यात स्थान मिळाले आहे.स्व.उमेश कडोळे उत्कृष्ट डफवादक,संबळवादक, गायक होते.त्यासोबतच ते चांगले साहित्यीक होते.ह्या वनौषधी वनात आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रुपाने त्यांच्या स्मृती जपल्या जातील.मठ संस्थान तर्फे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे." त्यानंतर दोन मिनेटे उभे राहून सर्वांनी सामुहिक मौन्य श्रद्धांजली अर्पण केली.शेवटी स्व.उमेश कडोळे स्मृतिप्रित्यर्थ,श्रीक्षेत्र रामगाव रामेश्वरच्या औषधीवनात आवळा व कडूलिंबाच्या बियाची लागवड आणि मठाचे आवारात, श्री.मार्तंडनाथ गुरु अभेद्यनाथ, श्री.नागनाथ गुरु अभेद्यनाथ ह्या संतमंडळी,वेदाभ्यासक रोहीत महाराज महाजन तसेच हभप.लोमेश पाटील चौधरी,अशोकराव मुदगल,देवमन मोरे,शेषराव पाटील इंगोले,नंदकिशोर कव्हळकर,सुधाकर इंगोले,गोपाल मुदगल,अशोक हांडे,दिनेश गाडगे,विजय खंडार, प्रमोद गीते,बाळकृष्ण काळे, विलास साखरकर,हभप.माणिक महाराज हांडे,चेतन इंगोले,सुरेश हांडे,विलास डोंगरे,भारत हांडगे चि.अर्थव कडोळे यांचे तसेच महिला मंडळी संगीता इंगोले,संगीता मुदगल,आशा महाजन,सविता गाडगे,कांता लोखंडे,इंदिरा मात्रे इत्यादीचे,हस्ते आवळ्याच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात येवून श्री.रामनाथ महाराजांचा महाप्रसाद करण्यात आला. कडोळे परिवाराकडून संतमंडळी सह भजनी मंडळीचा, मानसन्मान करण्यात येवून संजय कडोळे,कमलेश कडोळे,दिनेश कडोळे,अथर्व कडोळे,सौ सरला कमलेश कडोळे यांनी सर्वांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....