अकोला : शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा” या मोहिमेअंतर्गत शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील गोपनीयता, ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे उपाय तसेच डिजिटल जबाबदारी या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत त्यापासून कशाप्रकारे बचाव करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन साक्षी दिनेश शिरसाट आणि प्रणाली विजय दवने यांनी केले.
ही कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला चे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू सर व समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर मॅडम यांच्या सहयोगाने घेण्यात आली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक इम्तियाज अहमद खान यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल सवयी विकसित होतात असे मत व्यक्त केले.