वाशिम/अमरावती: (जिल्हा प्रतिनिधी,संजय कडोळे) : अद्वैत अमरावती द्वारा आयोजित, "अद्वैत विदर्भ करंडक – २०२४ विदर्भ स्तरीय मराठी खुली एकांकिका स्पर्धचा" बक्षिस वितरण सोहळा, नुकताच सिपना इंजिनियरिंग कॉलेज, येथील "अरविंद लिमये नाट्यगृहात" पार पडला. अमरावतीचे ज्येष्ठ रंगकर्मी नाना उर्फ एम. टी. देशमुख,ओडीसी नृत्यांगना सौ. शीतलताई मेटकर, अरुणजी घडेकर,एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते नानकराम नेभनानी, लोभस घडेकर, आदित्य ओक तथा स्पर्धेला लाभलेले परीक्षक अविनाशजी कोल्हे,मुंबई व विश्वास पांगारकर, पुणे यांच्या हस्ते संपन्न झाला. दोन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेत १९ नाट्यसंस्था सहभागी झाल्या होत्या.त्यापैकी १५ नायसंस्थांकडून १५ एकांकिका सादर झाल्यात.ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिका "अद्वैत विदर्भ करंडक २०२५" चा सन्मान पटकविला तो, "गंधर्व बहुउद्देशीय,अमरावती" निर्मित "लॉटरी" या एकांकिकेने,तसेच द्वितीय अद्वैत विदर्भ करंडक चंद्र्रथ थिएटर्स,नागपूरच्या "पावसाच्या सरी" एकांकिने तर तृतीय अद्वैत विदर्भ करंडक, थोरवी थिएटर्स,नागपूर "वि.प्र." तर लक्षवेधी एकांकिकाचा अद्वैत विदर्भ करंडक अभंग बहुउद्देशीय संस्था,अमरावती "रानभूल" एकांकिने पटकविला.वैयक्तिक पुरस्कार प्रथम,द्वितीय व तृतीय पुरस्कार एकूण ८ विभाग करून देण्यात आलेले होते.पार्श्वसंगीत प्रथम गंगेश अनासाने,द्वितीय अभिजित झाडे,तृतीय ट्विंकल चोपडे,नेपथ्य प्रथम शिवानी ठाकरे,द्वितीय देवयानी चोपडे, तृतीय आयुष बुलकुंदे,प्रकाशयोजना प्रथम शुभम ठाकरे,द्वितीय हर्ष नागभिडे,तृतीय संतोष चोपडे, रंगभूषा प्रथम बाबा खिरेकर, द्वितीय अग्रजा भुरे,तृतीय विवेक वसाके,अभिनेत्री मुक्ता बहाळे, द्वितीय भावना चौधरी,तृतीय करुणा कदम,अभिनेता प्रथम प्रथमेश हाते,द्वितीय मनिष चौधरी,तृतीय सौरभ मांडवकर, उतेजानार्थ अभिनय पयोष्णी ठाकूर,तुषार काकड, राहुल वासनकर,रौनक पळसापुरे,रुद्र भद्रे,आदित्य बुलकुंदे,सत्यम किरकटे,शार्दुल मोहरील, अनुराधा वाठोडकर,विनोदी कलावंत प्रथम शिवम मस्के, बालकलावंत प्रथम अंश केदार, दिग्दर्शक प्रथम दीपक नांदगावकर,द्वितीय तन्मय गंधे, तृतीय यशवंत चोपडे,लेखक प्रथम दीपक नांदगावकर, द्वितीय तन्मय गंधे,तृतीय चंद्रकांत चौधरी यांनी पारितोषिक पटकाविले.परीक्षक अविनाश कोल्हे व परीक्षक विश्वास पांगारकर व राज्य नाट्य स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल सौ. शर्वरी ठाकरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.नटराज पुजन,मान्यवरांचे स्वागत,मनोगत झाल्यावर बक्षिस वितरण सोहळ्याला सुरवात झाली.बक्षिस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन विशाल रमेश तराळ,तर आभारप्रदर्शन सौ.संजिवनी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.श्याम देशमुख, सौ.तृप्ती मेश्राम, सौ. स्वाती तराळ, अनुराग वानखडे,अजय इंगळे, विलास पकडे,स्वेहा तराळ, अद्वैत तराळ,समाधान तांबे यांनी परिश्रम घेतले.असे वृत्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे प्रसिद्धीसाठी, अद्वैत,अमरावतीच्या सचिव
कलोपासक,सौ.स्वाती तराळ यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....