अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या वृक्ष संवर्धनाच्या संकल्पासह 24 तास कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामाजिक रक्षाबंधन साजरे करण्यात आले. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दरवर्षी दिव्यांग बांधव राख्या तयार करतात. *ह्या राख्या रक्षाबंधन निमित्त १९ ऑगस्ट २०२४ रोजी अकोल्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी बंधू यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याने प्रत्येक कार्यालयात जाऊन संस्थेतर्फे वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. तेथील कर्मचाऱ्यांना वृक्ष भेट देऊन त्या वृक्षाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला अकोल्यातील सर्व कार्यालयांनी मोठा प्रतिसाद देत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सर्व सामाजिक उपक्रमांना अकोलेकरांनी भरभरून साथ द्यावी असे आव्हान केले.जिल्हा स्त्री रुग्णालय, मुख्य पोस्ट कार्यालय, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन इत्यादी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या वैविध्यपूर्ण रक्षाबंधन कार्यक्रमात आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.*ज्या दिव्यांग बांधवांना रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन अनामिका देशपांडे यांनी केले*.रक्षाबंधन व पर्यावरण संरक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्मिता मिश्रा,हरीश शर्मा, विजय कोरडे, अदिती वाडे,मंजूषा बदरखे, श्रीकांत कोरडे यांनी सहकार्य केले.