कारंजा : राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज यांच्या पवित्र पुण्यतिथी निमित्ताने,कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेकडून दरवर्षी प्रमाणे,श्री गुरुदेव सेवाश्रम,गुरुकुंज मोझरी येथे जाऊन,गुरुदेवांचे पवित्र अभिवादन करण्यात आले.गुरुदेवाचे दर्शन घेऊन पुष्पहार वहाण्यात आले.यावेळी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,वैदर्भिय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार,हवामान तज्ञ गोपाल गावंडे,अमरावती जिल्ह्यातील गोंधळी लोक कलावंत गोपाल मुदगल, विश्वनाथ पाटील गावंडे,से. नि.प्राचार्य माणिकराव नागरे, अतुल भुयार गुरुजी, अँड.सौ. मंगलाताई नागरे,सौ.शारदाताई भुयार,सौ.कृपाताई ठाकरे आदींची उपस्थिती होती.