मुंबई/वाशिम : "स्वतःच्या कुटुंबावर,घरादारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवून सभोवतालच्या समाजामध्ये,राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करणारे आणि अंधश्रद्धा, हुंडाप्रथा,बालविवाह,समाजातील निरक्षरता,भृणहत्या व्यसनाधिनता इत्यादी कुप्रथाचे निर्मूलन व्हावे.लेक वाचली पाहीजे.लेक शिकली पाहिजे. याकरीता रात्रंदिवस आपल्या किर्तन,भारूड,गोंधळ जागरण,पोवाडे, कलापथक,शाहीरी इत्यादी लोककला मधून समाजप्रबोधन करणाऱ्या कलावंताचे वृद्धापकाळी अक्षरशः हाल होत असतात.कारण दारिद्रयावस्थेत असणाऱ्या कलावंताची म्हातारपणी ना उदरनिर्वाहाची सोय असते ना औषधोपचाराची. परंतु महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागामार्फत लोककलावंताकरीता दरमहा वृद्धापकाळ साहित्यीक कलाकार मानधन योजना सुरु केलेली आहे.परंतु गेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणूका पासून, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समिती गठीत करण्यात आली नसल्याने जिल्हयातील हजारो कलाकार मानधन योजनेपासून वंचित राहीले आहेत.त्यामुळे कलावंताचे प्रलंबित अर्ज निकाली काढून त्यांना मानधन सुरू करणे गरजेचे होते.शिवाय सध्याची महागाई पहाता कलावंताना मिळणारे मानधन तुटपुंजे असून कलावंताना मानधनात वाढ करून, सरसकट दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन सुरू होणे गरजेचे होते तसेच गेल्या पाच वर्षापासून समाजसेवकांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार इत्यादीचे पुरस्कार सोहळे झाले नव्हते त्यामुळे या व इतर न्याय्य मागण्यांकरीता,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड)च्या वतीने, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात दि 24 जानेवारी 2024 रोजी लोककलावंताचे विराट असे, "क्रांतिकारी धरणे आंदोलन" करण्यात आले होते. व तसे जिल्ह्यांच्या महिला खासदार भावनाताई यांना देखील संजय कडोळे, सौ कृपाताई ठाकरे, सौ सिमाताई सातपुते, सौ छायाताई गावंडे, सौ शारदाताई भुयार, लोमेश चौधरी, अभा मराठी नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर, डॉ इम्तियाज लुलानिया, उमेश अनासाने यांचे कडून संघटनेचे निवेदन देण्यात आले होते.या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हयातील शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या सक्रिय कार्यकर्त्या तथा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ वैशाली येळणे (मॅडम) यांनी खासदारांच्या आदेशाने, मला "दि 07 फेब्रुवारी 2024 रोजी, मुख्यमंत्री महोदयाचे सचिवालयात स्वतः सोबत चालण्याचे सांगितले तसेच मी तुमचे रेल्वे आरक्षण करून घेते व माझ्याच खर्चाने आपण जाऊन,मुखमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सचिव संजय मोरे साहेब यांची भेट घेऊन त्यांना खासदार भावनाताई यांचा निरोप देऊन कलावंताच्या मागण्या सोडवूनच घेऊ." असे सांगीतले होते परंतु मी प्रकृती स्वास्था मुळे जाऊ शकलो नाही परंतु,त्यांचेकडे मुख्यमंत्र्याचे नावे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे निवेदन दिले. व वृद्ध कलावंताच्या न्याय हक्काकरीता दि 7 फेब्रुवारी 2024 रोजी स्वतः सौ वैशालीताई येळणे ह्या गेल्यात, व मुखमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सचिव संजय मोरे यांच्याशी, लोककलावंताच्या विविध प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना कलावंताच्या विविध समस्याची जाण करून दिली. त्यावर सचिव संजय मोरे यांनी मुखमंत्री महोदयाशी लोककलावंताच्या समस्यांविषयी माहिती देऊन आपल्या न्यायहक्काच्या मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे तुम्ही तुमच्या सर्व मागण्या मंजूर झाल्यात असे समजून चला असे मोरे साहेबांनी जिल्हाध्यक्षा सौ.वैशाली येळणे (मॅडम) यांना सांगीतले.खासदार भावनाताई गवळी आणि जिल्हाध्यक्षा सौ.वैशाली येळणे (मॅडम) यांनी लोककलावंताच्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सोहळ्याचे दि 12 मार्च 2024 रोजी आयोजन केले तसेच अखेर आज दि 16 मार्च 2024 रोजी वृद्ध कलावंताना सरसकट पाच हजार रुपये मानधन वाढीचा निर्णय जाहीर करून एप्रिल महिन्या पासून मानधन वाढ लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. सौ वैशालीताई येळणे यांनी सेवाव्रती भावनेतून स्वखर्चाने प्रयत्न केल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे कलावंतावर उपकार मानून आभार व्यक्त केले आहे.