कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दिनांक 10 जुलै 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेंद्र पाटणी यांच्या शुभहस्ते कारंजा तालुक्यातील पसरणी ,वडगाव इजारा ,धामणी इत्यादी गावांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे असतील. पसरणी येथे सकाळी 9 वाजता(1) गुरुभारती महाराज समाज मंदिर परिसरात समाज मंडपाचे बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये, (2)अल्पसंख्यांक निधीतून शादी खाना बांधकाम करणे 15 लक्ष रुपये,2515 अंतर्गत पसरणी येथे स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे, (3)स्थनिक आमदार योजना निधीतून पसरणी ते सोहळ रस्त्यावर सीडी वर्क बांधकाम करणे अंदाजीत किंमत दहा लाख रुपये.
वडगाव इजारा येथे सकाळी 10 वाजता (1)2515 अंतर्गत विलास गरड ते उकंडा जेमा पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये,(2) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत वडगाव ई. ता.कारंजा येथे बौद्ध विहार दलित वस्तीमध्ये सभा मंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10लक्ष रुपये,
धामणी येथे सकाळी 11 वाजता (1)आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून शादी खाना लोकार्पण अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये,(2) राज्यस्तरीय दलित वस्ती निधीतून सभामंडप बांधकाम करणे अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये,(3) 2515 - 1238 अंतर्गत नर्मदेश्वर मंदिर परिसर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये, (4)जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामाचे अंदाजीत किंमत 1 कोटी 12 लक्ष रुपये (नळ कनेक्शन पाईपलाईन व पाण्याची टाकी बांधकाम करणे),(5) दलित वस्तीत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत 8 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर आणि धामणी पसरणी वडगाव येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे. असे संजय भेंडे भाजपा ता. प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.