नागभीड:
संजय वि. येरणे साहित्यिक, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी, पं. स. नागभिड, जि. चंद्पूर यांना राज्य शासनाचा अत्यंत मानाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार दिनांक 5 सप्टेंबर 2023 ला मुंबई येथे मान, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. शिक्षणमंत्री दीपक केसकर, यांचे शुभहस्ते टाटा नॅशनल सेंटर परफॉर्मिंग आर्ट, नरिमन पॉईंट मुंबई येथे मानपत्र देत प्रदान करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमात मा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मा. आ. मंगलप्रभात लोढा मा. आ. कपिल पाटील शिक्षणआयुक्त सुरज मांढरे, तथा शिक्षण विभागाचे सर्व संचालक, उपसंचालक यांचेही आशीर्वाद लाभले.
संजय येरणे यांनी शालेय गुणवत्ता वाढीकरिता इंग्रजी रिडिंग पॅटर्नचे संशोधन करून कृतीपुस्तिकेचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना करुन दिला आहे, त्यांनी साहित्य प्रकारात इतिहास संशोधन व संतसाहित्य यावर अभ्यास करून जगातील सर्वप्रथम कादंबरी विषय हाताळत संत जगनाडे महाराज एक योद्धा, संत जगनाडे महाराजांची पत्नी यमुना आणि पेशवेकालीन वीरांगना ताई तेलिन वर रमास्त्र अशा तीन कांदबरी लिहीत महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. कादंबरी, कथा, समीक्षा, बालसाहित्य, कविता आदि प्रकारात तीस पुस्तके प्रकाशित करुन अनेक मानाचे साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत, विद्यार्थीप्रियता जोपासत शाळेला दर्जा मिळवून देण्याचा सदोदित प्रयत्न यामुळे जिल्हा पुरस्कारानेही सन्मान झाला आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय आपले विद्यार्थी, पालक, यांना दिले, मान. पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, शिक्षणाधिकारी हिवारे साहेब, गटशिक्षणाधकारी पालवे साहेब, जि.प सदस्य संजयभाऊ गजपुरे, सौ. भंडारे मैडम शिविअ. मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, केंद्रप्रमुख प्रदीप मोटघरे, सागर शंभरकर, नरेंद्र वासनिक सर, कु, रेश्मिता गुरनुले टीचर, करिष्मा गुरनुले टिचर, शाव्यस. अध्यक्षा जयश्री उईके, संतोष भाऊ गुरनुले, सरपंच सौ. कल्लूताई नेवारे, पोलिस पाटील, शारदाताई चौधरी, नंदपुरकरताई अं.से., विवेक इडपत्तीवार सर, यांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळवीत त्यांचे अभिनंदन सर्व शिक्षकवृंद, मित्रमंडळी यांनी केले आहे...!!
आपल्या प्रतिक्रिया द्या....