कारंजा : कारंजानगरीचे आराध्य दैवत व कारंजेकरांची कुलस्वामिनी ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या श्री कामाक्षा देवीच्या शारदीय श्री नवरात्रोत्सवाला रविवार दि. 15 ऑक्टोंबर 2023 पासून प्रारंभ होत असून श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,संपूर्ण भारतात श्री कामाक्षा देवीचे दोनच ठिकाणी शक्तिपीठ आहेत.त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे म्हणजे विदर्भ राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील पवित्र शक्तीपीठ कारंजनगरी होय.श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी,मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवी म्हणून ओळखल्या जाते.या मंदिराचा संपूर्ण कारभार महाजन कुटुंबियाकडे आहे.त्याचप्रमाणे संस्थांनचे शारदीय श्री नवरात्र उत्सवातील कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील रविवार दि. 15 ऑक्टोंबर 2023 रोजी श्रीदेवीचा मंगला अभिषेक व घटस्थापना होणार आहे तसेच नवरात्रोत्सवात दररोज दुपारी 3:00 ते 6:00 व रात्री 9:00 ते 12:00 पर्यत दररोज भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच षष्ठीचा जोगवा दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या 07:00 च्या आरतीनंतर लगेचच श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच (श्री कामाक्षा देवीचे प्रमुख गोंधळी श्री. ज्ञानेश्वर कडोळे व कडोळे परिवार) कारंजा यांचा जोगव्याचा कार्यक्रम होईल.तसेच दि. 21 ऑक्टोंबर 2023 ला दुपारी 2 : 00 वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित उपासकाचे सप्तशती पाठ व रात्री 9 : 00 वाजता महा अष्टमीचा होम हवन पूर्णाहूती व दीपमाळ प्रज्वलन कार्यक्रम व महाआरती दिनांक 24 ऑक्टोबर 2023 विजयादशमी निमित्त सकाळी महाभिषेक श्री कामाक्षा मातेचा शृंगार होणार आहे तसेच नवरात्र उत्सवात दररोज दुपारी 12 : 00 वाजता व रात्री 07 : 00 वाजता आरती होईल
तरी भाविक भक्त मंडळींनी श्री कामाक्षा मातेच्या दर्शनाचा व श्री नवरात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री कामाक्षादेवी संस्थान कडून दिगंबर महाजन यांचेतर्फे करण्यात आले आहे.