कारंजा (करंजमहात्म्य प्रतिनिधी अशोकराव उपाध्ये) :कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे तरुणीचा नग्न अवस्थेत मृत देह आढळल्याची घटणा उमा प्रकल्प पुलाखाली दि.३० मे रोजी उघडकीस आली. त्यामुळे जिल्हाभर एकच खळबळ उडाली होती. काजळेश्वर जवळील उमाप्रकल्प पुलाखाली मृतदेह दिसल्याने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण खंडारे साहेब ;उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाडवी साहेब यांनी पोलीस अधीक्षक अनुज तारे साहेब यांचे मार्गदर्शनात आपल्या पोलीस पथकासह तपास काम सुरु केले. सदर तपास हा योग्य दिशेने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे मत मांडत तपास असतांना तपासात सज्जन व्यक्तीला; निर्दोष व्यक्तीला त्रास होऊ नये याची दक्षता पोलीसाकडून घेतल्या जावी.असे काजळेश्वर आदिवासी पाड्यावर सांत्वनपर भेटी दरम्यान दि.१ जून रोजी कारंजा येथील माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख तथा जनसेवक दत्तराज डहाके आले असता म्हणाले.
वृत्त असे की ३० मे रोजी सदर घटना उघडकीस आल्या नंतर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार; उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाडवी आपल्या पोलीस फोर्स सह घटनास्थळी खबर पोहचताच हजर झाले. सोबत वाशिम फॉरन्सीक टिम ही होती. पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हा कारंज उप जिल्हा रुग्णालयाला नेण्यात आला. दि.३१ मे रोजी पोस्टमार्टम झाल्या नंतर मृतदेह कुटूंबीयांचे ताब्यात देण्यात आला .
. दुपारी मृतदेहावर अंत्यसंस्कार काजळेश्वर येथे संपन्न झाला. दि १ जून रोजी डॉग पथक काजळेश्वर येथे दाखल झाले व तपासासाठी ठाणेदार प्रवीण खंडारे सकाळ संध्याकाळ काजळेश्वर येथे तपासासाठी येत आहेत.त्यामुळे तपास योग्य दिशेने दिसत असल्याचे मत जनसेवक दत्ता भाऊ डहाके यांनी सांत्वना भेटीत आदिवासी पाड्यावर व्यक्त केले .फक्त पोलिसांनी तपास कार्य करीत असतांना सज्जनांना; निर्दोष व्यक्तीला त्रास होऊ नये.असे मत व्यक्त केले. अजूनही मुख्य आरोपी मिळाला नसल्याने त्याकरीता पोलीसांना
साठी ही घटणा आव्हान ठरत आहे. दोन दिवसात आरोपी पकडल्या जावा अन्यथा आम्हाला सीआडी तपासाकडे जावे लागेल.असे याप्रसंगी जनसेवक दत्ता भाऊ डहाके म्हणाले.आदिवासी समाज बांधवाना कुटूंबीयांना पोलीस निश्चीत न्याय देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत त्यांना धीर दिला. आदिवासी समाज बांधवा तर्फे गोलू धुर्वे यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच नितीन पा उपाध्ये; उपसरपंच तैसीम भाई; तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये; माजी ग्रापं सदस्य जम्मू भाई; कल्लू भाई; पंस सदस्य फौजी रंगराव धूवै; गोलू धुर्वे ज्ञान तोडासे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते .
चौकट:--
या अगोदर दोन संशयीतांना ताब्यात घेतले होते तपासा अन्ती त्यांना सोडले . त्यानंतर तीन संशयीत ताब्यात घेतले होते त्यांचा तपास सुरु आहे . आज डॉग पथक दाखल झाले . त्यानुसारही तपास चालू आहे . तपासयंत्रना तपास कार्य पोलीस अधीक्षक अनुज तारे साहेब; उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी साहेब यांच्या मार्गदर्शनात ताकदीने कामाला लागली आहे .आरोपी लवकरच हाती येईल . मृत मुलीला त्यांच्या कुटूंबीयांना न्याय देण्यासाठी पोलीस तत्परतेने काम करीत आहे .