गडचिरोली :-
शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे. दिव्यांग बांधव यांना ६०००/- रूपये मासिक मानधन देण्यासाठी दिनांक ११/०४/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजता आमदार महोदयांचे घरासमोर मशाल आंदोलन केला.
महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते. आम्ही निवडुण आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे.
अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुण आलेले आमदार महोदय कर्ज माफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे.
एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दूपट्टा व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेवुन आम्ही सर्व कार्यकर्ते मा. बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्ष, संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात
१) शेतकरी कर्जमाफी, २) पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणेबाबत, ३) दिव्यांग बांधव यांना ६००० रूपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत.
तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजुर करून सर्व शेतकरी व दिव्यांगा बांधवाना न्याय द्यावा, याकरीता या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरीता हे आंदोलन केला.
मशाल आंदोलन करतांना निखिल धार्मिक जिल्हा अध्यक्ष गडचिरोली विकास धंदरे आरमोरी विधान सभा अध्यक्ष अनंता भोयर प्रहार अपंग क्रांती उपाध्यक्ष विवेक ठाकरे आरमोरी तालुका अधक्ष विक्की उंदीरवाडे अरविंद धाकाते केवल दुमाने फकिरा भोयर दिनेश धोटे तुमदेव नैताम,येमाजी सयाम,खुशाल चिळंगे,वासुदेव निकोडे,पुरुषोत्तम नेताम
भास्कर कंकलवार,
रितिक सोनुले, व शेकडो शेतकरी उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....