उमरखेड :- शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा सेवानिवृत्त शिक्षक समाजसेवी श्री कृष्णराव विठ्ठलराव काळेश्वरकर यांचे आज दि .26 जून रोजी सकाळी10:45 वाजता वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले .मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्ष होते .पुसद व उमरखेड येथील विधीज्ञ अँड. मनोज काळेश्वरकर , भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर व औषधी सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांचे ते वडील होते .
कृष्णराव काळेश्वरकर यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान होते .
त्यांचे पश्चात तीन मुले , सुना नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे . त्यांचे पार्थिवावर उद्या दि 27 जून रोजी सकाळी नऊ वाजता महागाव रोडवरील हिंदू मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .