ब्रम्हपुरी:-अड्याळ टेकडी
दिनांक 11/6/2024
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी रजि. नं. एफ/162/ दिनांक 15/11/1963 चे संस्थापित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या वतीने श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी चे निर्माते निष्काम कर्मयोगी, समाधीस्थ परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांचा (तिथी प्रमाणे) अठरावा पुण्यतिथी महोत्सव ज्येष्ठ शुद्ध द्वादश दिनांक 19 जून 2024 रोज बुधवार ला सत्संग भवन श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित केलेला आहे.
मागील तीन वर्षापासून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी संस्थापित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ समिती अड्याळ टेकडी च्या वतीने परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांची पुण्यतिथी मराठी तिथीनुसार साजरी करण्यात येत आहे. प.पू तुकारामजी दादा गीताचार्य हे संत होते. संतांची पुण्यतिथी मराठी तिथी प्रमाणे होत असते त्यामुळे पूज्य तुकाराम दादांना संत स्वरूप मानून त्यांची पुण्यतिथी मराठी तिथीनुसार साजरी करण्यात येत आहे.
यावर्षी सुद्धा मराठी तिथी नुसार तुकारामजी दादांचा अठरावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असून उत्सवात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे, सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे, उप सर्वाधिकारी श्री दामोदर पाटील, प्रचार विभाग प्रमुख श्री प्रकाशजी वाघ, ऍड.दत्ता हजारे चंद्रपूर जील्हा सेवाधिकारी, श्री रूपराव कावळे चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख, प्रा. अशोक चरडे चंद्रपूर जिल्हा सेवाधीकारी, श्री दादाजी नंदनवार चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख, श्री विठ्ठलराव सावरकर प्रांत सेवाधीकारी, चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा कृषी अधीक्षक श्री भाऊसाहेब बऱ्हाटे, श्रीमती ताराबाई गाडेकर सरपंच ग्रामपंचायत अड्याळ (जाणी), श्री नामदेवराव लांजेवार उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गण अड्याळ (जाणी), ह.भ.प. श्री नाना महाराज, ह.भ.प. श्री गवते महाराज, ह.भ.प. श्री देवराव भुरे महाराज, श्री तुंडलवार गुरुजी श्री विठ्ठलराव पंचभाई येनोडा, श्री सयाम गुरुजी, श्री भुते गुरुजी उमरी, श्री विलासराव सावरकर, श्री महाकोडे गुरुजी तसेच अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास व संत स्वरूप पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांना भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सर्व श्रीगुरुदेव प्रेमी सज्जन भाविक वृंद माता भगिनी यांना आयोजकांनी पुण्यतिथी उत्सवाला उपस्थित राहण्याची सविनय विनंती केली आहे. यानिमित्याने
प्रातःस्मरण सकाळी 4:30 वाजता
सामुदायिक ध्यान सकाळी 5:00 वाजता
योग प्राणायाम सकाळी 6:00 वाजता
रामधुन सकाळी 7:00 वाजता
श्रमदान सकाळी 8:00 वाजता
ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचार प्रसार कार्यावर चर्चासत्र सकाळी 10:00 वाजता
सत्संग सकाळी 11:30 वाजता
महिला कार्यकर्त्यांचे संमेलन दुपारी 3:00 वाजता
सामुदायिक प्रार्थना व भावपूर्ण मौन श्रद्धांजली सायंकाळी 6:00 वाजता
राष्ट्रवंदना रात्री 10:00 वाजता
अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार असल्याचे भू वैकुंठ समितीचे सचिव श्री रविभाऊ उरकुडे यांनी गुरुपद गुंफा येथे पत्र परिषद घेऊन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे
मोरेश्वर दादाजी उईके, गिरीधर केशवराव अलबनकर, राजेंद्र प्रभाकर वंजारी, संतोष सिताराम भंडारकर, पवन रामचंद्र मगरे, प्रमोद रामदास नवघडे ,रमेश नारायण मेश्राम, दयाराम शिवराम कन्नाके, विजय आडकुजी भोयर, आशिष अंतर्देश सिंह, दिनेश अरुणजी तुमाने, ताणबाजी सखाराम उंबरकर, कैलास बापूराव भोयर, चेतन जयराम कवाडकर, आनंदराव संभाजी डफ, माधव तुकाराम नागापुरे, सिताराम देवाजी देशमुख, रवींद्र परशुराम उरकुडे, पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर, सुधाकरजी पिसे, डार्विन कोब्रा, हरीचंद्र धोंगडे, पंकज खोब्रागडे, राकेश बरबटकर, बारूबाई पांडुरंग ढोंगे, निर्गुणाताई अरविंद मोहुर्ले, मंदाताई माधव गुरूनुले, ज्योतीताई शिरपूरकर, जनाबाई देविदास जांभूळे, विमलबाई दयाराम गजभे, हिरालाल इंगुलकर, अजय कोसे, कैलास सोनुले, फाल्गुन मैंद, मच्छिंद्र चनोडे, गुरुदेव नागपूर, यशवंत निकुरे, वैभव कुसनाके इत्यादी सेवक उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....