नागपूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नागपूर येथील द्वितीय वैदर्भिय अधिवेशनात, "वैदर्भिय पत्रकारांचे विद्यापिठ" या सन्मानाने ओळखल्या जाणारे व महाराष्ट्र शासनाद्वारे वृत्तपत्रांच्या जाहिरातीचे दर दुप्पट तिप्पटने वाढविण्याची मंजूरी घेवून पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनलेले दैनिक महासागर तथा दैनिक नागपूर पोष्टचे संस्थापकिय संपादक तथा ज्येष्ठ दिर्घानुभवी पत्रकार श्रीकृष्ण चांडक हे नागपूर येथील "पत्रकारितेचे अर्थकारण" ह्या चर्चासत्राचे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित झाले असता, वाशिम जिल्ह्यातील ज्येष्ठ अनुभवी पत्रकार संजय कडोळे यांनी त्यांची भेट घेऊन सवांद साधला तसेच वाशिम जिल्ह्याच्या वतीने, स्वतः संजय कडोळे, राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब देशमुख,विदर्भ सरचिटणीस निलेशजी सोमाणी, किरण क्षार, सुनिल फुलारी, विजय पाटील खंडार, दामोधर जोंधळेकर, नरेंद्र बोरकर, महेन्द्र गुप्ता, चंद्रकांत चव्हाण, रामदास मिसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीकृष्णजी चांडक यांचा सत्कार केला . यावेळी श्रीकृष्ण चांडक यांचेशी बोलतांना संजय कडोळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, सन् 1990 ते सन् 1992 पर्यंत जवळ - जवळ दोन वर्ष पर्यंत आपण दैनिक महासागरला "प्रतिभा आणि प्रतिमा " या स्तंभाचे स्तंभलेखक म्हणून कार्य केले असल्याची आठवण करून दिली असता गुरुवर्य श्रीकृष्ण चांडक यांनी सुद्धा आपणास आठवण असल्याची कबूली देऊन तीस वर्षानंतर आज आपली भेट होत असल्याचे सांगीतले . तसेच संजय कडोळे यांच्या साप्ताहिक करंज महात्म्यला शुभेच्छा दिल्या .