आज ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत खास करून शरीराला पोषक द्रव्ये न मिळाल्या कारणाने अनेक आजार आक्रमण करीत आहेत विशेष करून ११ ते ४९ वयोगटातील मुली आणि महिलांना याचा जास्त सामना करावा लागत आहे कारण मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्त स्त्राव व शरीराला हवे असलेले पोषक द्रव्ये न मिळणे याचा परिणाम अनेक आजारांना निमंत्रण देणे व अनेमिया ग्रस्त होणे म्हणजेच शरीरातील लाल रक्त पेशी कमी होणे ज्या शरीराला ओक्सिजन चा पुरवठा करतात या सगळ्या समस्या विचारात घेता सर्वधर्म मित्र मंडळ व सहाय्यक ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने अकांशीत वाशीम जिल्यात अनेमिया मुक्त गाव संकल्पना राबविण्यात येत असून त्यात प्रायोगिक तत्वावर कारंजा लाड तालुक्यातील गाव निवडण्यात येणार व तेथे अनेमिया मुक्त गाव हि संकल्पना राबवून वाशीम जिल्ह्यात अनेमिया मुक्त गावाचा संदेश देणार आहे सदर संकल्पना उपक्रमाचा कालावधी ६ महिन्याचा राहणार आहे या उपक्रमाची व संकल्पनेची माहिती व प्रशासकीय स्तरावर सहकार्य मिळावे या उद्देश्याने सर्वधर्म मित्र मंडळ अनेमिया मुक्त वाशीम जिल्हा प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक राजू कांबळे यांनी दिनांक १२/१२/२०२४ रोजी वाशीम जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी मॅडम व मुख्यकार्यपालन अधिकारी श्री वैभव वाघमारे सर जि प वाशीम यांच्या कार्यालयत दिली आहे. तालुक्यातील ११ ग्राम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गावातील मुली व महिलांसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्था करणार आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये पोषण परसबाग कशी तयार करायची व कोणत्याही प्रकारच्या रासायनिक फवारणी तसेच रासायनिक खत याचा वापर न करता जैविक पोषण परसबाग तयार करून रोजच्या आहारात ताजे व जैविक पोषक तत्व कसे आपल्याला मिळतील याबाबत कार्यशाळा व प्रात्यक्षिक या माध्यमातून मार्गदर्शन संस्था करणार आहे.