अकोला_: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात वर्ग बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाचक - लेखनिक व अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध केला जात आहे. *या सर्व उपक्रमाचे फलित म्हणजे आज ५ मे २०२५ रोजी लागलेल्या वर्ग बारावीच्या निकालात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे मोहम्मद नाजील व मोईन खान हे दोन विद्यार्थी आपल्या अपंगत्वावर मात करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत*. डॉ. विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमाने अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याकरिता विशेष कौशल्याची सांगड घातली आहे. *ब्रेल लिपीचा उपयोग, वाचक लेखनिकाची उपलब्धता व अभ्यासक्रमाचे ध्वनीमुद्रण या सर्व गोष्टी एकत्रित करून अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती डॉ. विशाल कोरडे यांनी तयार केली आहे*.या अभ्यासक्रमाला संपूर्ण *भारतात पोहचविण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ही संस्था निरंतर कार्य करीत आहे*. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी अकोला येथे येऊन या सर्व बाबी डॉ.कोरडे यांच्या मार्गदर्शनात शिकत आहेत.
*मोहम्मद नाजिल व मोईन खान हे दोन अंध विद्यार्थी श्री शिवाजी महाविद्यालय येथे वर्ग बारावीत शिकत होते. या दिव्यांग विद्यार्थ्यांना डॉ. कोरडे यांनी रोशनी पवार व समीक्षा शिरसाट या वर्ग अकरावीतील विद्यार्थिनींना वाचक व लेखनिक म्हणून नियुक्त करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले*. हे दोन्ही विद्यार्थी अंध असल्याने वर्ग अकरावीपासूनच त्यांना वर्ग बारावीचा अभ्यासक्रम दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने ध्वनीमुद्रित करून देण्यात आला. वेळोवेळी या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी करण्यात आले .*याचा परिणाम म्हणजे बारावी मध्ये मोहम्मद नाजिल याला 67.83% तर मोईन खान याला 63% गुण प्राप्त झाले* .
या दोन्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला द्वारा स्वीकारण्यात आले असून या विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर परीक्षे पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. हे दोन्ही विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय गुरु डॉ.विशाल कोरडे, आई-वडील, वाचक व लेखनिक म्हणून कार्य करणारे रोशनी पवार, समीक्षा शिरसाट, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या शिक्षक वृंदांना देतात. भविष्यात मोहम्मद नाजिल हा स्पर्धा परीक्षा देऊन आपले नशीब चमकवणार असल्याचे व्यक्त करतो, तर मोईन खान संगीत क्षेत्रात भविष्य घडवणार असल्याचे सांगतो .
डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करीत असलेल्या शैक्षणिक कार्याला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य डॉ .रामेश्वर भिसे यांनी कौतुक करून सदर अंध विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .सदर शैक्षणिक उपक्रमासाठी डॉ. संजय तिडके, प्रा. अरविंद देव, अनामिका देशपांडे ,विशाल भोजने, विजय कोरडे, पूजा गुंटिवार ,अस्मिता मिश्रा ,अंकुश काळमेघ, सुजाता असोलकार यांचे सहकार्य निरंतर लाभत आहे .
जा दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाचक व लेखनिक हवे आहेत .त्यांनी *दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या 9423650090 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ.विशाल कोरडे यांनी केले आहे*.