केसलवाडा अड्याळ मार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने २७ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८. ३० वाजताच्या सुमारास पुरकाबोडी फाट्यावर घडली. वतन नत्थुजी केवट (२७) रा. सौदड पुर्वसन असे गंभीर जखमी इसमाचे नाव आहे. ट्रक क्रमांक एमएच ४० बाय ९८६४ चा चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून माडगीकडून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ ई ७७३६ ला धडक दिली. यात वतन केवट गंभीर जखमी झाला.. कल्पेश वामनराव सेलोकर रा. सौंदड पुर्वसन यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, मोटरवाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.