चिमूर तालुक्यातंर्गत मौजा शंकरपूर ते भिसी मार्गावर वाळू भरलेला हायवा पुलाखाली उलटा पडल्याने हायवा चालक व साहाय्यक याचा हायवा कॅबिन मध्ये दबून मृत्यू झाल्याचा दुःखद् घटनाक्रम घडला.
मृतक चालकाचे नाव दिपक इंद्रा दिप वय ३० वर्ष असे असून साहाय्यकाचे नाव प्रताप शिवकुमार राऊत वय २८ वर्ष असे आहे.
चालक व साहाय्यक नागपूर जिल्हा अंतर्गत उमरेड तालुक्यातील मौजा सुरगाव येथील रहिवासी आहेत.अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करीता चिमूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर पोलिस चौकीचे इन्चार्ज साहाय्यक पोलीस निरीक्षक चांदे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.