कारंजा (लाड) : वाढत्या उष्णतेमुळे आणि असह्य उकाड्याने हैरान असलेल्या कारंजेकर नागरिकांना,अक्षय तृतियेच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात,जिल्ह्यातील सुप्रसिध्द हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अचूक अंदाजाप्रमाणे काहीसा दिलासा मिळाला आहे. रात्री 8:00 नंतर पावसाला सुरुवात झाली असून, विजांच्या कडकडाटात आणि ढगाच्या गडगडाटात तालुक्या सह शहरी भागात रिमझिम पाऊस धारा कोसळत असून, अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे बत्ती गुलं झाल्याचे वृत्त मिळत आहे.