आजच्या स्पर्धेच्या युगात अभ्यासाबरोबर क्रीडा संमेलनाची नितांत आवश्यकता आहे कारण अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ होते तर क्रीडा संमेलनातून आणि खेळातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत वृद्धी होण्यास चालना मिळते असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले.
यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे आयोजित क्रीडा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानी श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव मा. डॉ. सचिन भाऊ खोब्रागडे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. अमोल धात्रक ,प्रा.पूनम दुर्योधन मॅडम, यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य अमरदीप मेश्राम जॉन सर आदी उपस्थित होते..
पुढे बोलताना भाग्यवानची खोब्रागडे म्हणाले की जीवनात आपल्याकडे किती संपत्ती आहे हे महत्त्वाचे नाही तर आपले आरोग्य हे किती चांगले आहे हे महत्त्वाचे आहे पैशाने आरोग्य विकत घेता येत नाही पण आरोग्य सुदृढ असल्यास पैसा मिळविता येतो आणि आनंदी जीवनाचा आस्वाद घेता येतो त्यामुळे शरीर ,शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ खेळणे आणि त्यासाठी क्रीडा संमेलनाची नीतांत आवश्यकताआहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानावरून बोलताना श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचिन भाऊ खोब्रागडे संबोधित करताना म्हणाले की विद्यार्थी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी मैदानी खेळातून विविध विद्यार्थी घडत असत दिवसेंदिवस विविध खेळांमध्ये बदल झालेले आहेत पण त्याचे महत्व सारखेच आहे. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली काही जर असेल तर ते स्वास्थ आहे आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खेळाडू वृत्ती आणि दैनंदिन व्यायाम महत्त्वाचा आहे त्यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळून आरोग्यदायक आणि आनंदी जीवन जगण्यास मिळते. खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट स्वास्थ जपण्यास मदत होते . सर्व विद्यार्थ्यांनी खेळायला वृत्तीने क्रीडा संमेलनाचा आस्वाद व आनंद घ्यावा असे आवाहन केले याप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा उचित मार्गदर्शन केल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजस्विनी सहारे यांनी केलं तर प्रास्ताविक प्राचार्य अमरदीप मेश्राम यांनी केलं आणि आभार प्रा.चीत्ररेखा मोहनकर यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतले.