कारंजा लाड:- विद्यार्थ्यामध्ये राष्ट्र भावना जागृत करण्याचं कार्य गेल्या 77 वर्षापासून अविरत व निरंतर करत येत असणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत आहे.
अभाविप च्या स्थापना दिनानिमित्त प्रा. यशवंतराव केळकर ह्यांच्या जन्मशताब्दी च्या आयोजनावर 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या नगर कार्यकारिणीची घोषणा कार्यक्रम किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालय येथे संपन्न झाला. ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप येवले, प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सौ रुपाली बाहेती, वक्ता म्हणून अभाविप विभाग संयोजक सुहास मोरे व प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप वाशिम जिल्हा सह संयोजक खुशी म्हातारमारे म्हणून उपस्थित होते.
ह्यावेळी एकूण 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. ह्यावेळी विद्यार्थी पालकांसोबत उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची नगर कार्यकारिणी घोषणा सुद्धा घोषणा करण्यात आली. ह्यावेळी पुननिर्वाचित नगर अध्यक्ष म्हणून डॉ. किरण वाघमारे व नवनिर्वाचित नगर मंत्री म्हणून प्राप्ती कदम ह्यांची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे नगर सहमंत्री म्हणून नीरज सुरटकर व स्मित लोढाया, कार्यालय प्रमुख म्हणून चारुल गुंठेवार, कोष प्रमुख म्हणून ब्रह्मा चव्हाण, सोशल मीडिया संयोजक म्हणून खुशी शिखरे, मीडिया संयोजक म्हणून संस्कृती कंटाळे, विकासार्थ विद्यार्थी संयोजक म्हणून निखिल राठोड, सेवार्थ विद्यार्थी संयोजक म्हणून श्रीपाद जोंधळे, राष्ट्रीय कला मंच संयोजक म्हणून नैतिक बांडे व खेलो भारत संयोजक म्हणून ऊर्जिता नेटके ह्यांची घोषणा करण्यात आली. असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.