सी आय आय म्हणजेच भारतीय उद्योग महासंघातर्फे काल दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.उद्योगातील आव्हानं आणि संधी याविषयी या चर्चासत्रात खासदार अनुप धोत्रे सह उद्योजक आणि महाराष्ट्रातील खासदारांनी आपले विचार मांडले.
यावेळी महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी छोटे छोटे जोड उद्योग निर्माण केले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी त्यातून उपलब्ध होतील व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास मोठ्या शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाणही कमी होईल असा विचार खासदार अनुप धोत्रे यांनी यावेळी व्यक्त करून उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या अनेक अपेक्षा शासन पूर्ण करत असून त्यांनी ग्रामीण भागाचा विकास करावा असे आवाहन केले .
छोटे छोटे बचत गट आणि शहरी व ग्रामीण भागातील गरीब लोक उद्योगरत होऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांची वाढ आणि समृद्धी कशी होईल या विषयावरही चर्चा चर्चा करून अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा खासदार धोत्रे यांनी व्यक्त केले.
तसेच मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून सीएसआर फंड च्या साह्याने महाराष्ट्रातील एक्स्पिरेशनल विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये युथ एम्पॉवरमेंट आणि नागरी सुविधांच्या विषयाला घेऊन काही विशेष प्रकल्प किंवा सहाय्य करता आले तर त्याकरता सहकार्याची अपेक्षा अशा मोठ्या उद्योगांकडून आम्हाला नक्कीच असते तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्पा सारखे वॉटर कंजर्वेशन चे जे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत यामध्ये काम करताना जो डीपीआर सबमिट करावा लागतो किंवा मतदार संघातील काही विधायक कामांचे नियोजन करताना आपल्या सारख्या मोठ्या उद्योजकांची मदत जर झाली तर ती निश्चितच या देशातील छोट्या शहरांचा विकास करण्यासंदर्भात उपयुक्त ठरेल असे मत यावेळी प्रभावीपणे खासदार अनुप धोत्रे यांनी या चर्चासत्रामध्ये मांडून सर्वांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील ग्रामीण भाग आणि नॉन मेट्रो सिटी मध्ये उद्योग वाढीसाठी मोठ्या उद्योजकांनी पाठबळ देऊन मदत करावी अशी अपेक्षा खासदार धोत्रे यांनीव्यक्त केली,तसेच मोठ्या उद्योजकांकरता लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा व सरकारतर्फे लागणारी मदत करण्यास वर्तमान केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार ही सकारात्मक असून याबाबत मोठ्या कंपन्यांनी व उद्योजकांनी महाराष्ट्रातील नॉन मेट्रो शहरांमध्ये येऊन त्या शहरांमध्ये उद्योजकता व रोजगार निर्मिती यासंदर्भात विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे याचा विचार करावा असेही मत खासदार धोत्रे यांनी मांडले आणि हा विचार सभागृहातील सर्वच उद्योजकांनी उचलून धरला.या चर्चा सत्रात विविध उद्योजक उपस्थित होते.त्यात चितळे उद्योग समूहाचे चितळे.कामत उद्योग समूहाचे विठ्ठल कामत,सुला वाईन्सचे संजीव पैठणकर हे देखील उपस्थित होते.
मोठ्या उद्योगांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारीची ही जाणीव फार सुखावह होती.या चर्चा सत्राला महाराष्ट्रातील ओमप्रकाश राजे निंबाळकर,अरविंद सावंत,संजय देशमुख,नरेश म्हस्के,धैर्यशील मोहिते पाटील,धनंजय महाडिक हे सर्व खासदार ही उपस्थित होते.