कारंजा :
भारती कला केंद्र परिक्षा द्वारा दिनांक २३ एप्रिल रोजी नृत्य परिक्षेचे आयोजन लोकमहाविद्यालय वर्धा येथे करण्यात आले होते यामध्ये कारंजा येथील नृत्यांगना शितल उजवणे यांच्या ४९ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सदर नृत्यकलेस चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये सिद्धी मुकीरवार,अस्मी पांगरे, ओजस्वी पापळे,स्पृहा चौधरी, सान्वी कानकिरड,ईशा गाहाणकरी,अन्वयी भेलांडे,नंदिनी देसाई,आरोही मिश्रीघोटकर, चिन्मयी मांगलकर,पयोश्नी पापडे,स्वरा लाहे, आराध्या उजवणे,देविना पांपडे, ओजस्वी शिवहरे, विहाना दर्यापूरकर, मनस्वी उखळककर, ओजस्वी कडू,प्रृथा निबुळकार,ओजस्वीनी वैध,माहिका दर्यापूरकर, प्रीयांशी लोखंडे, मृणाल सवडतकर,खूशी रूण,रुचिता केतकर यांनी सहभाग नोंदविला यावेळी परिवेक्षक म्हणून सचिन डंबारे सर यांनी परिक्षण केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....