कारंजा : गेल्या जून जुलै महिन्यांपासून सामाजिक न्याय विभागाचे संजय गांधी योजनेचे दरमहा अनुदान घेणारे,विधवा -परित्यक्त्या-घटस्फोटीत माता भगीनी,अंध व दिव्यांग बांधव व बहिनी,आणि श्रावण बाळ योजनेचे लाभ घेणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ निराधार माता-पित्यांचे अनुदान रखडले असल्यामुळे, निराधार अनुदानावर अवलंबून आपला चरितार्थ भागविणाऱ्या निराधाराचा जीव कासावीस होत असल्याने त्यांनी ( केशवराव राऊत,सुरेशजी,इम्तियाजबी अजिजशहा फकीर, राधेश्यामजी शर्मा, हसन पटेल, गंगुबाई रेघीवाले इत्यादी निराधार लाभार्थ्यानी) सहकार्य करण्याची मागणी,महाराष्ट्र अपंग संस्थेचे अध्यक्ष तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना केल्यावरून त्यांनी या संदर्भात कारंजा तहसिलचे कार्यतत्पर व हजरजबाबी तहसिलदार कुणाल झाल्टे साहेबांकडे विनंती केली असता,तहसिलदार कुणालजी झाल्टे साहेब यांनी तातडीने दखल घेऊन आपल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना, निराधाराच्या सेवेकरीता प्रथम प्राधान्य देण्याचे सांगून,लगेच धनादेश तयार करून,संबधीत सर्वच बँकामध्ये जमा करून निराधारांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा करून,तसे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना कळवीले.त्यामुळे संजय कडोळे यांनी निराधाराच्या अडचणीला प्राधान्य देणाऱ्या तहसिलदार कुणाल झाल्टे,आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी वृंदाचे ऋण व्यक्त करीत आभार सुद्धा मानले आहे.तसेच नागरिकाच्या अडचणीला प्राधान्य देणारे तहसिलदार लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.