ब्रह्मपुरी युवा पिढीवर व्यसनांचा विळखा एवढा पक्का बसला आहे की,व्यसन करणे म्हणजे फॅशन,चैन,अनुकरण प्रतिष्ठेचा झाला आहे.सिगरेट, दारू,तंबाखू,गुटखा,खर्रा आदीसह इतर अमली पदार्थाचे व्यसन युवकांना लागले आहे.आज ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी तालुक्यातील जवळपास ७० टक्के तरुणी तरुणांपर्यंत विविध व्यसन पोहचले आहे.तसेच आयुष्यात कधीही कसलेही व्यसन न केलेल्या तरुणांचे प्रमाण दहा टक्के इतके आहे.तसेच ज्याची कमाई जेवढी तो त्याप्रमाणे व्यसन करतो.आज सगळी युवा पिढी यात गुंतलेली आहे.असे अजिबात नाही. तर,कुठेतरी गणित चूकते आहे.बहुतांश तरुण वर्गाला व्यसनांनी आपल्या जाळ्यात ओढून घेतलेले दिसून येते.व्यसनात गुंतलेल्यामध्ये सतत चिडचिड होणे, क्रोध व मत्सर या विकाराचे प्रमाण वाढणे,एकलकोंडेपणा, अनामिक भीती,वैफल्यग्रस्तता,संशय आपल्याला कोणी समजून घेत नाही असे सतत वाटत असते.रक्तवाहिन्या कमकुवत होणे,स्नायू,सांध्याची कार्यक्षमता कमी होत जाणे,मज्जासंस्थेचे संबंधित कार्यात बिघाड,पचनशक्ती क्षीण होणे,यकृत आणि किडनी खराब होणे,मधुमेह रक्तदाब आदी विकार यामुळे जडत आहेत.व्यसनावर जास्तीत जास्त पैसे उजडणे,नोकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे,घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष,उधारी करणे किंवा कर्ज काढणे,नोकरी-व्यवसाय बंद पडणे आदी बाबीमुळे घडत आहे.