कळसाचा दगड सर्वच होतात परंतु पायाचा दगड घडविण्याचे निस्वार्थ कार्य अद्वैत संस्था करते. -लोभस घडेकर.
अद्वैत विदर्भ करंडक एकांकिका सोहळा सोत्साह संपन्न.
अमरावती : दिवंगत नाट्यतपस्वी कै.डॉ.सौ. संध्याताई घडेकर आणि नाट्यकर्मी कै.सौ.शुभदाताई ओक यांना समर्पित असलेल्या सन २०२५ च्या "अद्वैत विदर्भ करंडक सोहळ्यानिमित्त" विदर्भस्तरिय मराठी एकांकिका खुल्या स्पर्धेचे,शाही आयोजन स्व.अरविंदजी उर्फ भाऊ लिमये नाट्यगृह अमरावती येथे दि.३१ मे २०२५ आणि दि. ०१ जून २०२५ रोजी, करण्यात आले होते. त्यानिमित्त पहिल्या संपन्न झालेल्या उद्घाटन कार्यक्रमातून बोलतांना अद्वैत विदर्भ करंडक सोहळ्याचे उद्घाटक विशाल खिरे म्हणाले, "सुसंस्कृत समाजासाठी सांस्कृतिक चळवळ जीवंत ठेवणे आजच्या काळाची गरज आहे." तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष लोभस घडेकर म्हणाले, "आपल्या अमरावतीच्या अद्वैत बहुउद्देशीय संस्थेचे कार्य बहुमोलाचे असून,नाट्य चळवळ जीवंत ठेवण्याचे कार्य ते करत आहेत. स्वतः विनम्रता घेऊन नाट्यमंदिराच्या पायाचा कळस होऊन नवोदित कलावंताना घडविण्याचे निःस्वार्थ कार्य उद्वैत संस्था करीत असून त्यांच्या कार्याला तोड नाही." असे सांगत त्यांनी नाट्य कलावंताचा उत्साह वाढवीला.उल्लेखनिय म्हणजे पूर्व - पश्चिम विदर्भातील तब्बल एकोणावीस नाट्यसंस्थांनी ह्या एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदवील्याने,अमरावतीकरांना सतत दोन दिवस एक अंकी नाटकांची मधूर मेजवानी मिळणार आहे. सिपना इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात, लोभस घडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शक विशाल खिरे यांनी दिपप्रज्वलन करून केले.
त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात येवून उपस्थितांचे मनोगत झाले.यावेळी समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अरुण घडेकर,देवा शेडमाके तर एकांकिका स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी परिक्षक म्हणून अविनाश कोल्हे, विश्वास पांगारकर, सौ. संजीवनी पुरोहित (अध्यक्षा अद्वैत अमरावती) व अव्दैतचे माजी अध्यक्ष रमेशजी तराळ उपस्थित होते.
या निमित्ताने,आपल्या जीवनाची चाळीस वर्ष नाट्यचळवळीला समर्पित करणाऱ्या अमरावतीच्या ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्याम देशमुख यांना "अद्वैत नाट्य जीवनगौरव पुरस्कार २०२५ आणि झाडीपट्टी रंगभूमीवर गेल्या ३० वर्षापासून नाट्यकलावंत म्हणून योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी लालचंद उसेडी उर्फ पी. लालचंद यांनाही अद्वैत पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यानंतर अद्वैत अमरावती निर्मित,धनंजय सरदेशपांडे लिखीत व विशाल रमेश तराळ दिग्दर्शित बालनाट्य, "तेरा मेरा सपना- टि.व्ही.हो अपना." या बालराज्य नायस्पर्धेच्या बक्षिस प्राप्त नाटकाचे बालकलाकार स्वेहा तराळ,स्वरा ठाकरे,अवणी लोंढेकर, आर्या मांडवे, तन्मय पारेकर, संकेत दिवे, सक्षम तायडे, आलोप पाथरकर, केतन सुळके, स्वर्णिम शिवनकर, आणि अद्वेत तराळ तसेच सौ तृप्ती मेश्राम, तुषार ठक्कर यांचा गुणगौरव करीत सत्कार करण्यात आला.सदर उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचलन सौ. रसिका वडवेकर-देशमुख यांनी प्रास्ताविक सौ. संजिवनी पुरोहित यांनी, तर आभार प्रदर्शन नाट्यकर्मी विशाल रमेश तराळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अद्वैतचे सौ.तृप्ती मेश्राम,सौ.स्वाती तराळ,अनुराग वानखडे,अजय इंगळे,तुषार ठक्कर,इशिता वरगट,स्वेहा तराळ,अव्दैत तराळ,समाधान तांबे अथक परिश्रम घेत आहेत. त्यानंतर "उत्तरायण" एकांकिने दोन दिवशीय एकांकिका स्पर्धेला आरंभ करण्यात आला.सदर कार्यक्रमाला विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संजय कडोळे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.परंतु नाट्य परिषद शाखा नागपूरच्या निवडणूकी निमित्त नंदकिशोर कव्हळकर परिक्षक असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.असे वृत्त नाट्यकर्मी विशाल रमेश तराळ यांचेकडून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी करीता देण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....